Gold Silver Price Today: सोनं खरेदीची हीच योग्य वेळ? सोन्याच्या दरात घसरण सुरुच; चांदीही झाली स्वस्त, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Price Today: देशभरात सोन्याच्या दरातील घसरण सुरूच असून 13 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 1,39,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली आहे. दिल्लीपासून मुंबई आणि पुण्यापर्यंत अनेक शहरांमध्ये सोन्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

13 नोव्हेंबर रोजी सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1 लाख 39 हजार 940 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 1 लाख 28 हजार 340 रुपये आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 39 हजार 790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 28 हजार 140 रुपये आहे.

दिल्लीतील सराफा बाजारात काल 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात तब्बल 2,200 रुपयांची घसरण झाली होती. मागणीत झालेली घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे.

मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किती?

13 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार

दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा दर 1,39,940 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,28,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई आणि कोलकाता: या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,28,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई: येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,39,790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,28,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे आणि बंगळुरू: या शहरांमध्येही 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,790 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,28,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर घसरले

केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 3,880.93 डॉलर प्रति औंस आहे. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारातील सोन्याच्या किमतींवरही होत आहे.

Gold Silver Price Today
Cigarette Price Hike: आता सिगारेटही महागली; एका पाकिटासाठी मोजावे लागणार इतके रुपये, काय आहे दरवाढीमागचं कारण?

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण सुरू आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव 1 किलोमागे 1 लाख 99 हजार 900 रुपये आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीने 4 लाख रुपये प्रति किलोचा विक्रमी टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold Silver Price Today
Milk Price Hike 2026: नंदिनी, अमूल आणि आता मदर डेअरीने दुधाचे दर वाढवले; दरवाढीमागचं खरं कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 50.12 डॉलर प्रति औंस आहे. त्यामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सध्या घसरण दिसत आहे.

आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. मात्र, खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील सराफा बाजारात प्रत्यक्ष दर तपासणे आवश्यक आहे. तसेच दागिने खरेदी करताना घडणावळ आणि जीएसटीचा खर्चही लक्षात घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.