Gold-Silver Price Today: सोने 2,500 रुपयांनी कोसळले! चांदीतही मोठी घसरण; खरेदीची संधी की आणखी पडझड होणार?

Gold-Silver Price Today: MCX वर सोन्याच्या वायदा दरात 2,500 रुपयांहून अधिक घसरण झाली असून तो सुमारे 1.50 लाख रुपयांवर व्यवहार करत आहे.
Gold-Silver Price Today
Gold-Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold-Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आज मोठी घसरण पाहायला मिळाली. देशांतर्गत वायदा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे लक्ष पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे लागले आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी घसरणीसह व्यवहार सुरू केला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचाही त्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

सोन्याच्या दरात 2,500 रुपयांहून अधिक घसरण

MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीच्या सोन्याच्या बेंचमार्क कराराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. मागील सत्रात 1,52,443 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेला हा करार आज तब्बल 2,517 रुपयांनी घसरून 1,49,926 रुपयांवर खुला झाला.

बातमी लिहिली जात असताना सोन्याचा वायदा भाव सुमारे 2,241 रुपयांच्या घसरणीसह 1,50,202 रुपयांवर व्यवहार करत होता. दिवसभरात सोन्याने 1,50,290 रुपयांचा उच्चांक आणि 1,49,888 रुपयांचा नीचांक गाठला.

विशेष म्हणजे, याच वर्षात सोन्याने 1,80,779 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता दरात झालेली घसरण गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

Gold-Silver Price Today
PM Kisan 23rd Installment: PM किसानचा 23 वा हप्ता कधी येणार? 30 जूनपूर्वी हे काम न केल्यास अडकू शकतात 2,000 रुपये

चांदीची चमकही फिकी

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. MCX वर जुलै डिलिव्हरीच्या चांदीच्या बेंचमार्क कराराची सुरुवात 4,519 रुपयांच्या घसरणीसह 2,34,009 रुपयांवर झाली.

मागील सत्रात हा करार 2,38,528 रुपयांवर बंद झाला होता. व्यवहारादरम्यान चांदीचा भाव सुमारे 3,272 रुपयांनी घसरून 2,35,256 रुपयांवर पोहोचला.

दिवसभरात चांदीने 2,35,657 रुपयांचा उच्चांक आणि 2,34,000 रुपयांचा नीचांक गाठला. यावर्षी चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

घसरणीमागे काय कारण?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरमधील हालचाली, व्याजदरांबाबतची अपेक्षा आणि गुंतवणूकदारांचा बदलता कल यांचा परिणाम मौल्यवान धातूंवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव वाढतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतीय वायदा बाजारावरही दिसून येतो. आजची घसरण त्याचाच भाग असल्याचे मानले जात आहे.

Gold-Silver Price Today
Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा वाढणार? सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार; दर वाढण्याचे कारण काय?

गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावे?

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अल्पावधीत मोठे चढ-उतार दिसत असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही घसरण मोठी संधी ठरू शकते, असे बाजार तज्ज्ञ सांगतात. मात्र कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील ट्रेंड, जागतिक घडामोडी आणि स्वतःची आर्थिक उद्दिष्टे यांचा विचार करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news