Gold Price Fall: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; सोन्याचे भाव 25 हजार रुपयांनी स्वस्त होणार, काय आहे कारण?

Gold Price Fall Prediction: सोन्याच्या दरात घसरण सुरू असून पुढील काळात ते 1.27 लाखांपर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मजबूत डॉलर, वाढते कच्चे तेल आणि महागाईची भीती यामुळे सोन्यावर दबाव आहे.
Gold Price Fall Prediction
Gold Price Fall PredictionPudhari
Published on
Updated on

Gold Price Fall Prediction: सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या भावात घसरण दिसून आली असून, पुढील काळात ही घसरण आणखी वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. काही विश्लेषकांच्या मते, सोने थेट 1.27 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचा भाव 1,51,910 रुपये आहे. म्हणजे सोन्याच्या भावात आणखीन 25 हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे.

मध्यपूर्वेतील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किंमतीतील वाढ आणि अमेरिकन डॉलरमधील तेजी या सगळ्या घटकांचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. युद्धाच्या सुरुवातीला सोने सुमारे 1.60 लाख रुपयांच्या आसपास होते, मात्र अलीकडे MCX वर सोने 1,44,825 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

तज्ज्ञांच्या मते, सध्या जागतिक अर्थव्यवस्था एका गुंतागुंतीच्या टप्प्यातून जात आहे. एका बाजूला भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला वाढत्या महागाईमुळे आणि व्याजदरांमुळे त्यावर दबाव आहे. या दोन विरोधी कारणांमध्ये सोन्याचा भाव अडकला आहे.

SS WealthStreet च्या संस्थापक सुगंधा सचदेवा यांच्या मते, पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा क्षेत्रात मोठं संकट निर्माण झालं आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे तेलाच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. यामुळे जगभरात महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महागाई वाढली की मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतात, ज्याचा थेट परिणाम सोन्यावर होतो.

Gold Price Fall Prediction
Dhurandhar 2 Box Office Collection: ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 2 दिवसांत किती कोटी कमावले? 10 चित्रपटांना टाकलं मागे

अमेरिकेत महागाई नियंत्रणात न आल्यास Federal Reserve व्याजदर वाढवू शकते. व्याजदर वाढल्यावर गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याकडे वळतात. त्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तुलनेने स्वस्त होते.

याशिवाय, जेव्हा सोन्याचे दर 1.50 लाख रुपयांच्या पुढे जातात, तेव्हा अनेक गुंतवणूकदार नफा बुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री करतात. त्यामुळे बाजारात पुरवठा वाढतो आणि दर घसरू लागतात. भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे सोने खरेदीदार देश असल्याने, दर वाढल्यास मागणी कमी होते आणि त्याचाही परिणाम किमतींवर होतो.

SEBI-नोंदणीकृत तज्ज्ञ अनुज गुप्ता यांच्या मते, युद्ध सुरू असतानाही सोन्याचे दर स्थिर किंवा खाली आहेत, कारण बाजाराला भविष्यातील महागाईची चिंता आहे. त्यामुळे जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवण्याच्या किंवा ते जास्त ठेवण्याच्या विचारात आहेत.

Gold Price Fall Prediction
MS Dhoni Video: ‘धोनी नीट चालू शकत नाही?’ IPL आधी व्हिडिओ व्हायरल; फिटनेसवर प्रश्नचिन्ह, चाहते चिंतेत

आगामी काळात सोन्याचे दर कोणत्या पातळीवर राहतील, याबाबतही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. LKP सिक्युरिटीजचे जतीन त्रिवेदी यांच्या मते, सध्या सोन्याचा ट्रेंड कमकुवत असून दर 1.40 लाख ते 1.47 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकतात. मात्र, जर दबाव कायम राहिला, तर भाव 1.35 लाख आणि पुढे 1.27 लाख रुपयांपर्यंत घसरू शकतात.

एकूणच, सध्या सोन्याच्या बाजारात अनिश्चितता कायम आहे. गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे की धोका, हे येणाऱ्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला आहे की घाईत निर्णय न घेता बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच आर्थिक सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news