Gold-Silver Price Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी; सोन्याचे भाव 2 हजारांनी स्वस्त, चांदी मात्र महागली

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,44,550 रुपयांवर आला आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on
Updated on

Gold-Silver Price Today: सोन्याचे भाव घसरत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज (2 जुलै) 24 कॅरेट सोन्याच्या दरात जवळपास 1,900 रुपयांची घट झाली आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली असून प्रति किलो दरात 1,500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

आजचे सोन्याचे दर

आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,44,550 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत यात सुमारे 1.3 टक्क्यांची घट झाली आहे. काल हा दर 1,46,454 रुपये होता.

त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,08,412 रुपये असून त्यातही 1,428 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे 1 ग्रॅम सोनं सुमारे 190 रुपयांनी, तर 100 ग्रॅम सोनं तब्बल 19 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे.

चांदीच्या दरात वाढ

सोन्याच्या उलट आज चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. स्पॉट मार्केटमध्ये खरेदी वाढल्याने चांदीचा दर प्रति किलो 1,400 ते 1,500 रुपयांनी वाढून 2,40,100 रुपयांवर पोहोचला आहे.

काही शहरांमध्ये स्थानिक करांमुळे चांदीचा दर 2,45,000 रुपये प्रति किलो आहे. एक ग्रॅम चांदीची किंमत 240 ते 245 रुपयांच्या दरम्यान आहे.

सोन्याचे दर का घसरत आहेत?

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या दरातील घसरणीमागे अनेक कारणे आहेत. सोन्याचे भाव आणखी कमी होतील, या अपेक्षेने अनेक नागरिक जुनं सोनं विकत आहेत. चालू तिमाहीत भारतीयांनी सुमारे 50 टन जुनं सोनं विकल्याने बाजारात पुरवठा वाढला असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

Gold Silver Price Today
Amarnath Yatra 2026: बाबा बर्फानी कोण आहेत? त्यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक का करतात कठीण यात्रा? भाग्यवंतांनाच मिळते दर्शन

याशिवाय, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर ठेवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी सरकारी रोख्यांमध्ये (Bonds) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे.

तसेच अमेरिकी डॉलर मजबूत होत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांसाठी सोनं खरेदी करणं महाग होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही सोन्याची मागणी घटली असून त्याचा परिणाम किमतींवर दिसून येत आहे.

खरेदीसाठी योग्य वेळ?

सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक असली, तरी पुढील काळात जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरचा दर आणि अमेरिकेच्या व्याजदरांवरील निर्णय यावर सोन्या-चांदीच्या किमती अवलंबून राहतील. त्यामुळे गुंतवणूक किंवा खरेदी करण्यापूर्वी बाजारातील स्थितीचा अभ्यास करणे तज्ज्ञांच्या मते आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news