EPFO Rule Change: नियम बदलणार... आता १५ नाही तर २५ हजारांवर पीएफ अन् पेन्शनचं काँट्रिब्युशन द्यावं लागणार

EPFO Rule Change
EPFO Rule Changepudhari
Published on
Updated on

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निधी संघटना एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर आता पगार आणि पेन्शन या दोन्हीवर परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना देखील पेन्शनचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे मूळ वेतन हे २५ हजार रूपये आहे त्यांना पेन्शन मिळणार आहे. कारण इपीएफओची वेतन मर्यादा ही १५ हजारावरून २५ हजार करण्यात आली आहे.

EPFO Rule Change
EPFO New Rule: कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 15 जुलैपर्यंत PFवरील व्याज मिळणार; नवीन सिस्टीम लागू होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१४ मध्ये ही मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर या वेतन मर्यादेत गेल्या १२ वर्षात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार नवीन मर्यादा निश्चित करण्याचा उद्येश हा कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या पीएफ आणि पेन्शन कवरेजला जास्तीजास्त पगारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा आहे.

EPFO Rule Change
EPFO New Rule: EPFOचा मोठा निर्णय! 1,800 रुपयांपर्यंत PF योगदान अनिवार्य; पैसे काढण्याचे नियमही बदलले

मनी कंट्रोलन दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी आणि कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत अनिवार्य वेतन मर्यादा ही १५ हजार रूपयांवरून वाढवून २५ हजार रूपये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटमध्ये पाठवला जाईल. हा नियम २० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व नोंदणीकृत कंपन्यांना लागू होणार आहे.

EPFO Rule Change
PF NPS Rule Changes: सेव्हिंगचा गेम ओव्हर? PF-NPS मध्ये 3 मोठे बदल; निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येणार

अनिवार्य वेतन मर्यादा म्हणजे काय?

अनिवार्य वेतन मर्यादा हा सहसा मूळ वेतन असते (मूळ वेतन अधिक डीए) ज्यावर प्रोव्हिडेंट फंड अर्थात पीएफ आणि पेन्शन इपीएसचे काँट्रिब्युशन देणं बंधनकारक असतं. आधी हे लिमीट १५ हजार होते आता ते वाढवून २५ हजार करण्याचा विचार सुरू आहे. जर यापेक्षा जास्त पगार असेल तर त्यांना या स्कीममधून बाहेर पडण्याचा वप्याय होता. कंपनी १५००० मूळ पगाराच्या हिशेबानेच आपले योगदान देते.

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार केंद्रीय श्रम मंत्रालय आणि इपीएफओने यापूर्वी ही मर्यादा ३० हजार रूपये करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र अर्थ मंत्रालयाने चर्चा करून ही मर्यादा २५ हजार रूपये प्रती महिना करण्याचा निर्णय घेतला.

EPFO Rule Change
FD Rule Change: आता FD वर मिळणार घवघवीत व्याजदर... RBI मोठे बदल करण्याच्या तयारीत

सरकारच्या या नियमामुळं कंपन्या आणि सरकार दोघांवर आर्थिक दबाव वाढणार आहे वेतन मर्यादा वाढवण्याने कंपन्यांना आता जास्त कर्मचाऱ्यांना पीएफ आणि पेन्शनसाठी १२ टक्के योगदान द्यावे लागणार आहे. त्यामुळं त्यांची पेरोल कॉस्ट वाढणार आहे. तसेच पेंशन फंडमध्ये सरकारचे योगदान देखील वाढणार आहे. सरकार पेन्शनबाबत कर्मचाऱ्यांना लाभ देते. त्याचबरोबर पीएफवरील व्याजाचे काँट्रिब्युशन देखील वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news