

EMI planning tips
नवी दिल्ली : घर खरेदी असो, गाडी घेणे असो किंवा वैयक्तिक गरजा पूर्ण करणे असो, या सर्वांसाठी कर्ज घेणे सोपे झाले आहे. मात्र, अनेक लोकांसाठी कर्जाचा हप्ता (EMI) भरणे डोकेदुखी ठरते. प्रत्येक महिन्याचे हप्त्याचे बजेट का बिघडवते, यामागचे कारण जाणून घेऊया.
खरं तर होम लोन, पर्सनल लोन किंवा इतर कोणतेही कर्ज फेडण्यासाठी EMI चा वापर केला जातो. अनेकदा लोक विचार न करता कर्ज घेतात आणि नंतर EMI त्यांच्या बजेटच्या बाहेर जातो. म्हणूनच आपण Debt-to-Income Ratio (DTI) बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला EMI चा कधीही त्रास होणार नाही.
Debt-to-Income Ratio म्हणजेच DTI हे सांगते की, तुम्ही तुमच्या महिन्याच्या पगारातील किती टक्के हिस्सा EMI म्हणून देऊ शकता. हे कॅल्क्युलेट करणे अत्यंत सोपे आहे. समजा तुमचा पगार 50,000 आहे आणि EMI 15,000 आहे, तर तुमचा DTI 30% असेल. याचा अर्थ असा की तुमच्या उत्पन्नाचा 30 टक्के हिस्सा आधीच EMI मध्ये जात आहे.
जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही, तर तुमचा सिबिल स्कोर खराब होईल.
बँक कर्ज मंजूर करण्यापूर्वी हे पाहते की तुमचा EMI तुमच्या उत्पन्नाच्या 30-40% पेक्षा जास्त नसावा.
जर EMI खूप जास्त असेल, तर तुमच्या बचतीवर आणि इतर खर्चांवर परिणाम होतो.
ज्यांचा DTI कमी असतो, त्यांना बँका कमी व्याजदराने कर्ज देण्यास तयार असतात.
अनेक आर्थिक तज्ज्ञांच्या मते, तुमच्या पगाराच्या 30% पेक्षा जास्त रक्कम EMI मध्ये जाऊ नये. यामुळे घराचा खर्च, मुलांचे शिक्षण, मेडिकल इमर्जन्सी आणि बचत यांसारख्या इतर गरजा सुरक्षित राहतात.