Height and Salary: उंच लोकांना खरोखरच जास्त पैसे मिळतात का? काय सांगतय उंची आणि पगाराच्या संबंधावर नवीन संशोधन?

उंच व्यक्तींना त्यांच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा अधिक वेतन मिळण्याची शक्यता जास्त असते, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
Height and Salary
Height and SalaryAI Photo
Published on
Updated on

Height and Salary

नवी दिल्ली: एखाद्या कार्यक्रमात उपस्थित असताना, उंच व्यक्ती साहजिकच इतरांचे अधिक लक्ष वेधून घेतात, असे आपण सर्वांनीच ऐकले आहे. पण, या साध्याशा निरीक्षणाचा त्यांच्या पगारावर प्रत्यक्ष परिणाम होत असेल, तर? आश्चर्यकारक बाब म्हणजे, संशोधनानुसार याचे उत्तर 'हो' असेच आहे; आणि याचे कारण त्या व्यक्तीच्या क्षमतेशी कमी, तर जगाचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याच्याशी अधिक संबंधित आहे.

'द हाईट प्रीमियम: अ सिस्टमॅटिक रिव्ह्यू अँड मेटा-ॲनालिसिस' या जागतिक स्तरावरील एका संशोधनातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. माणसाच्या क्षमतेपेक्षा, जग त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, यावरच त्यांचा पगार अधिक ठरतो आणि उंच व्यक्तींना त्यांच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा अधिक वेतन मिळण्याची शक्यता जास्त असते, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.

जगभरातील ४२ संशोधन अहवालांचा अभ्यास

या संशोधनादरम्यान जगभरातील ४२ वेगवेगळ्या शोधनिबंधांचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यापैकी तब्बल ३३ अहवालांमध्ये एकच समान बाब समोर आली; ती म्हणजे कमी उंचीच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत उंच व्यक्तींना सातत्याने अधिक वेतन मिळत होते. कॉर्पोरेट जगतात या ट्रेंडला 'हाईट प्रीमियम' असे म्हटले जाते. हा प्रभाव विशेषतः पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आला आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये हा प्रभाव तीव्र आहे, तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आढळले.

Height and Salary
Abhijeet Dipke Protest: कॉकरोच आता रस्त्यावर उतरणार; अभिजित दिपके 6 जूनला भारतात येणार, दिल्लीत आंदोलनाची तयारी सुरू

मानसशास्त्रीय कारणे काय आहेत?

संशोधकांच्या मते, यामागे उंच व्यक्ती अधिक हुशार किंवा कष्टाळू असणे हे कारण नसून, मानवी मानसशास्त्र आणि सामाजिक दृष्टिकोन कारणीभूत आहे. बालपणापासूनच आपल्या मनावर बिंबवलं जात की, उंची म्हणजे अधिकार, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण! त्यामुळे एखादी उंच व्यक्ती जेव्हा कार्यालयात किंवा मिटींगध्ये येते, तेव्हा तिची पहिली छाप अधिक प्रभावी पडते. नकळत होणाऱ्या याच मानसिकतेमुळे नोकरी मिळणे, पदोन्नती होणे आणि नेतृत्वाची संधी मिळणे यांत उंच व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.

उंचीचा थेट संबंध बालपणातील परिस्थितीशी

आता, तुम्ही तुमची उंची मोजायला सुरुवात करण्यापूर्वी, असे का घडते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे संशोधन असा दावा करत नाही की उंच लोक अधिक हुशार किंवा जास्त मेहनती असतात. याउलट, उंचीचा थेट संबंध बालपणातील परिस्थितीशी जोडला गेला आहे. ज्या मुलांना बालपणात उत्तम पोषण, दर्जेदार आरोग्य सेवा आणि चांगली जीवनशैली मिळते, त्यांची उंची चांगली वाढण्याची शक्यता जास्त असते. साहजिकच, अशा मुलांना चांगल्या शाळा, कौटुंबिक पाठिंबा आणि उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतात, ज्या पुढे त्यांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरतात. म्हणजेच, उंची हे यशाचे थेट कारण नसले, तरी ते बालपणातील सुबत्तेचे एक लक्षण असू शकते.

कमी उंचीच्या व्यक्ती करिअरमध्ये मागे राहतात का?

या संशोधनाचा अर्थ असा मुळीच नाही की, कमी उंचीच्या व्यक्ती करिअरमध्ये मागे राहतात. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, उंची हा यशाचा एक अतिशय छोटा घटक आहे. कामाच्या ठिकाणी होणारा हा केवळ एक पक्षपात आहे, तो कोणताही नियम नाही. तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक कौशल्ये, कामाचा अनुभव, संवादकौशल्याची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे अपार कष्ट हेच तुमच्या करिअरची दिशा ठरवणारे मुख्य घटक आहेत. त्यामुळे, कोणत्याही मुलाखतीला किंवा व्यावसायिक मिटींगसाठी जाताना हे लक्षात ठेवा की, उंचीमुळे केवळ पहिली छाप पडू शकते; मात्र तुमचे भविष्य हे केवळ तुमच्या कौशल्यांवर आणि तुमच्या चारित्र्यावरच अवलंबून असते.

Height and Salary
Unclaimed Financial Assets: विसरलेले पैसे शोधण्याची सुवर्णसंधी! सरकारने सुरू केले नवे पोर्टल; एका मिनिटात करा तपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news