DA Hike News: दिवाळीपूर्वी दोन राज्यांनी DA मध्ये केली वाढ... महाराष्ट्राची काय स्थिती?

केंद्र सरकारकडून देखील गेल्या महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपल्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.
DA Hike News
DA Hike Newspudhari
Published on: 
Updated on: 

DA Hike News: दिवाळीपूर्वी दोन राज्यांनी आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यातील एक राज्य महाराष्ट्राचे शेजारी राज्य आहे. नुकतेच कर्नाटक आणि अरूणाचल प्रदेश या दोन राज्यांनी आपल्या महागाई भत्त्यात (DA) मध्ये वाढ केली आहे. या दोन राज्यांपूर्वी अजून काही राज्यांनी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ केली होती. तसेच केंद्र सरकारकडून देखील गेल्या महिन्यात महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती.

DA Hike News
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट; महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ, केंद्र सरकारचा निर्णय

कर्नाटकात २.५ टक्के वाढ

शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्य सरकाराने महागाई भत्त्यात २.५ टक्क्यांची वाढ केली. आता कर्नाटक राज्य कर्मचाऱ्यांना १८ टक्के डीए मिळणार आहे. हा महागाई भत्ता १ जुलै पासून प्रभावी होणार आहे.

अरूणचाल प्रदेशने ३ टक्के वाढवला

अरूणाचल प्रदेश राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा ६३ टक्के झाला आहे. हा महागाई भत्ता १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत महागाई भत्ता वाढवल्याची माहिती दिली.

DA Hike News
DA hike news: ८ व्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनर्सचा खिसा होणार गरम; ४ महिन्याचा एरियर मिळणार एकदम?

केंद्र सरकारनेही वाढवला महागाई भत्ता

केंद्र सरकारकडून वर्षात दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. पहिली सायकल ही जानेवारी महिन्यात असते तर दुसरी सायकल ही जुलै महिन्यात असते. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने २ टक्के महागाई भत्ता वाढवला होता. त्यानंतर जुलैच्या सायकलमध्ये ३ टक्क्यांची वाढ केली आहे. असा वर्षाला एकूण ५ टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ६३ टक्के झाला आहे.

DA Hike News
BJP Government | भाजप सरकारच्या पंधरा वर्षांच्या यशस्वी कालखंडात गोव्याचा चौफेर आणि सर्वसमावेशक विकास; मुख्यमंत्र्यांचा दावा

इतर राज्यांनीही वाढवला महागाई भत्ता

सर्वात आधी तमिळनाडू सरकारने आपल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड या सारख्या राज्यांनी दिवाळीपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना डीए आणि डीईर वाढीची बेट दिली आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै मधील महागाई भत्ता वाढीबाबतचे सध्या तरी कोणते वृत्त नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.