BJP Government | भाजप सरकारच्या पंधरा वर्षांच्या यशस्वी कालखंडात गोव्याचा चौफेर आणि सर्वसमावेशक विकास; मुख्यमंत्र्यांचा दावा

BJP Government | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : 'आमचे गोवा, विकसित गोवा' वचनपूर्ती रथाचे अनावरण
Bjp
Bjppudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विकासाची सुरू केलेली परंपरा आपल्या सरकारच्या काळातही कायम ठेवली आहे. सरकारने केलेल्या चौफेर विकासाच्या बळावर येत्या निवडणुकीत भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Bjp
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

पर्वरी येथील मंत्रालयात गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत गोवा सरकारने गेल्या १५ वर्षांत केलेल्या विकासकामांची आणि योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे लोकार्पण केले.

तसेच सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'आमचे गोवा, विकसित गोवा' वचनपूर्ती रथाचे उद्घाटन केले. यावेळी सभापती डॉ. गणेश गावकर, खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, समाजकल्याणमंत्री सुभाश फळदेसाई उपस्थित होते.

Bjp
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

मुख्यमंत्री म्हणाले की, वचनपूर्तीची १५ वर्षे आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने डबल इंजिन सरकारची १३ वर्षे पूर्ण करताना गोव्याचा भरीव विकास करण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. कर्मचारी भरती आयोगामुळे पात्र आणि हुशार যুবकांना सरकारी नोकऱ्या मिळत असून, नोकर भरतीतील भ्रष्टाचार संपला आहे.

२४ हजार लोकांना कर्जफेडीस प्रवृत्त केले : मंत्री शिरोडकर

सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी आपल्या काळात कर्जाची परतफेड न करणाऱ्या २४ हजार कर्जदारांना पुन्हा कर्जफेड करण्यास आपल्या खात्याने प्रवृत्त केले, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. येत्या काळात चरावणे आणि पंचवाडी धरणांसोबत एकूण तीन धरणे बांधली जातील. ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध आहे. सर्वच क्षेत्रांचा विकास झाला असून, त्याचे फळ मतांच्या रूपाने भाजपला मिळेल, असे शिरोडकर म्हणाले.

Bjp
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

मुख्यमंत्री यांना शाबासकी देणे गरजेचे : राणे

मनोहर पर्रीकर यांच्या नंतर गोव्याचे सरकार योग्य प्रकारे चालवून राज्याचा भरीव विकास करणारे आणि स्वयंपूर्ण गोव्याचे ध्येय पुढे नेणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शाबासकी देण्याची गरज आहे. येत्या निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले.
शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि अन्य उत्पादने खरेदी करण्यासाठी गोवा सरकार दरवर्षी आठ कोटी रुपये खर्च करते. तसेच २४० सरकारी सेवा ऑनलाइन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.