DA hike news: ८ व्या वेतन आयोगापूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनर्सचा खिसा होणार गरम; ४ महिन्याचा एरियर मिळणार एकदम?

DA hike news
DA hike newspudhari
Published on
Updated on

DA hike news: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स जुलै २०२६ च्या सहा महिन्याचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई प्रोत्साहन भत्ता मिळण्याची वाट पाहत आहेत. गेल्या सहा महिन्यात कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याचा डीए हा ६० टक्के झाला होता. आता सरकार डीएमध्ये ३ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए वाढून ६३ टक्के होऊ शकतो.

डीएची वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. मात्र याची घोषणा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. जर सप्टेंबरमध्ये घोषणा झाली तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचा एरियर मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडं जर ऑक्टोबर महिन्यात घोषणा झाली तर चार महिन्याचा एरियर मिळेल.

DA hike news
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर, पगारात होणार घसघशीत वाढ

३ टक्क्यांचा अंदाज

लेबर ब्युरोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या महाईर आकड्यानंतर सरकार डीएमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स वाढून १४९.९ पर्यंत पोहचला आहे. याच्या आधारेच डीएचे कॅलक्युलेशन होते. सुरूवातीच्या चार महिन्यांच्या आकड्यावरून अंदाजे जूनपर्यंतची ही गणना ६३ टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे.

DA hike news
Maharashtra government DA hike : राज्य सरकारचा ‘या’ कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात 2 टक्के वाढ!

किती वाढ होणार?

जर डीएमध्ये तीन टक्के वाढ झाली तर किमान मूळ वेतन १८,००० असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए हा प्रत्येक महिन्याला ५४० रूपये वाढेल. त्यामुळे जर सप्टेंबर महिन्यात एरियर १५०० रूपयांपेक्षा जास्त मिळू शकतो. जर ऑक्टोबर महिन्यात एरियर मिळाला तर तो २००० रूपयांपेक्षा जास्त मिळू शकतो.

DA hike news
8th Pay Commission: बेसिक पगार ६९,००० रूपये; ३.८३ फिटमेंट फॅक्टर... रेंज पार ९.५७ लाखांपर्यंत; तुमचा पगार किती वाढणार?

आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर घोषणा

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आता या डीएची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी संघटनांनी नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यापूर्वी किमान ५० टक्के डीए हा बेसिक पे मध्ये मर्ज केला जावा अशी मागणी केली आहे.

सरकारने गेल्या वर्षी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. या आयोगीच्या शिफारसी पुढच्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सरकारला सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र या शिफरशी एक जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची आशा आहे. असं झालं तर सरकारी कर्मचाऱ्यांना एरियर म्हणून मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. हा एरियर १८ ते २० महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news