Stock Market | शेअर बाजारात ब्लडबाथ! गुंतवणूकदारांचे ७.९८ लाख कोटी उडाले

चार सत्रांतील तेजीला ब्रेक लागला
Stock Market BSE benchmark Sensex NSE Nifty
आज सेन्सेक्स ७३८ अंकांनी घसरून ८०,६०४ वर बंद झाला. तर निफ्टी २६९ अंकांच्या घसरणीसह २४,५३० वर स्थिरावला. file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजारातील (Stock Market) चार सत्रांतील तेजीला शुक्रवारी (दि.१९) ब्रेक लागला. सेन्सेक्स (BSE benchmark Sensex) ७३८ अंकांनी घसरून ८०,६०४ वर बंद झाला. तर निफ्टी (NSE Nifty) २६९ अंकांच्या घसरणीसह २४,५३० वर स्थिरावला. सेन्सेक्सवरील ३० पैकी २७ शेअर्स आज लाल रंगात बंद झाले. प्रमुख अर्थव्यवस्थांमधील अनिश्चिततेमुळे गुंतवणूदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे

  • शेअर बाजारातील चार सत्रांतील तेजीला ब्रेक.

  • सेन्सेक्स ७३८ अंकांनी घसरून ८०,६०४ वर बंद.

  • निफ्टी २६९ अंकांच्या घसरणीसह २४,५३० वर स्थिरावला.

  • गुंतवणूकदारांची सावध भूमिका, सर्व क्षेत्रात विक्रीचा सपाटा.

  • केवळ इन्फोसिसचा शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढून बंद.

  • टाटा स्टीलचा शेअर्स ५ टक्क्यांनी घसरला.

  • जेएसडब्ल्यूचा शेअर्स ४.६ टक्क्यांनी घसरला.

  • क्षेत्रीय निर्देशांकात मेटल आणि रियल्टीला सर्वाधिक फटका

  • मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांना ७.९८ लाख कोटींचा फटका

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, गुंतवणूकदारांचा आज प्रॉफिट बुकिंगकडे कल दिसून आला. आज सर्व क्षेत्रात विक्रीचा सपाटा राहिला. बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ७.९८ लाख कोटींनी कमी होऊन ४४६.३४ लाख कोटींवर आले.

Stock Market BSE benchmark Sensex NSE Nifty
Budget 2024 |स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा होऊ शकते 50 हजारांवरून 1 लाख

निफ्टी मेटलला फटका

क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, ऑटो, मीडिया, रियल्टी, ऑईल आणि गॅसला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी मेटल निर्देशांक सुमारे ४ टक्क्यांनी. निफ्टी ऑटो, मीडिया, रियल्टी, ऑईल आणि गॅस सुमारे २ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले.

टाटा स्टीलचा शेअर्स टॉप लूजर

सेन्सेक्सवर टाटा स्टीलचा शेअर्स टॉप लूजर ठरला. हा शेअर्स आज ५ टक्क्यांनी घसरून १५७ रुपयांपर्यंत खाली आला. त्याचसोबत जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एम अँड एम, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, रिलायन्स, नेस्ले इंडिया हे शेअर्सही घसरले. तर इन्फोसिस, आयटीसी, एशियन पेंट्स हे शेअर्स तेजीत राहिले.

BSE benchmark Sensex
बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी २६ शेअर्स आज लाल रंगात बंद झाले.BSE

निफ्टीवर टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, बीपीसीएल, हिंदाल्को, ओएनजीसी हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांपर्यंत घसरले. तर इन्फोसिस, आयटीसी, एशियन पेंट्स हे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले.

NSE Nifty
निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख. NSE
Stock Market BSE benchmark Sensex NSE Nifty
दक्षता : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी...

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news