

corporate ceo departures 2026: कॉर्पोरेट जगतासाठी २०२६ वर्ष मोठ्या घडामोडींचे राहिले आहे. २०२५ आणि २०२६ च्या सुरूवातीला जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल झाले आहेत. सिलिकॉन व्हॅली पासून मोठ्या एअरलाईन्समध्ये काही ठिकाणी निवृत्ती, संक्रमण काळ आणि वैयक्तिक कारणास्तव नेतृत्वात बदल झाले आहेत. काही नेतृत्व बदल हे भविष्यावर नजर ठेवून केलेल्या रणनैतिक निर्णयाचा भाग आहे. तर काही नेतृत्व बदल हे ढोबळमानानं पिढीतला बदल आहे. आता कॉर्पोरेट जगत नवीन वृद्धीच्या आणि अडथळ्यांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. त्याचीच ही तयारी आहे.
OpenAI मध्ये श्रीनिवास नारायणन यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी आपण पद सोडत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी ओपन AI मध्ये बी २ बी अॅप्लिकेशनमध्ये सीटीओ पदावर काम केलं. त्यांनी चॅट जीपीटीला एक एन्टरप्राईज बनवण्यात मदत केली होती. नारायणन यांनी तीन वर्षाचा आपला काळ हा जबरदस्त होता असं सांगितलं. नारायणन यांनी पद सोडण्याचा निर्णय हा आपल्या भारतातील वयस्कर पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी घेतला.
दरम्यान, अॅपलचे सीईओ यांनी देखील आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते १ सप्टेंबर २०२६ मध्ये आपल्या पदावरून पाउतार होणार आहेत. ते आता एक्झिक्युटिटव्ह चेअरमन पद सांभाळणार आहेत. त्यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात अॅपलला ४ ट्रिलियन डॉलरची कंपनी बनवली. आता कूक हे धोरण आणि गव्हर्नन्सवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहेत. अॅपलचे सीईओ पद हे हार्डवेअर प्रमुख जॉन टर्नस यांच्याकडे जाणार आहे. हा कंपनीच्या इतिहासातील एक मोठा बदल असणार आहे.
नेटफ्लिक्सचे सह संस्थापक रीड हेस्टिंग्स हे देखील नेटफ्लिक्समधून पूर्णपणे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी जून २०२६ मध्ये आपला कार्यकाळा संपल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सीईओ पदाचा २०२३ मध्येच राजीनामा दिला होता. ते एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनले होते. त्यांनी आपल्या जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत नेटफ्लिक्सला एक जागतिक स्ट्रमिंग जायंट बनवलं.
शांतनू नारायणन हे देखील अॅडोबच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांनी हे पद तब्बल १८ वर्षे सांभाळलं आहे. त्यांनी अॅडोबचे क्लाऊड बेस सबस्क्रीप्शन मॉडेल तयार केले. ते आता कंपनीचे चेअरमन म्हणून काम करणार आहेत. सध्या कंपनी नवीन सीईओच्या शोधात आहे.
विमान वाहतूक क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन हे आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. ते सप्टेंबरपर्यंत आपले पद सोडतील. कंपनीचे मेजर मर्जर, ट्रान्सफॉर्मेशन आणि स्टॅबिलेशन पाहिले आहेत. ते त्यांचा उत्तराधिकारी मिळेपर्यंत पदावर राहणार आहेत.
हे कॉर्पोरेट सेक्टरमधील मोठे नेतृत्व बदल कॉर्पोरेट जगतात एक मोठा रिसेट घेऊन येण्याची शक्यता आहे. अनेक मोठ्या बिजनेस हाऊसेस हे आपल्या पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा करून देण्याची शक्यता आहे.