Khamenei Death Betting: अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लोकांनी करोडो रुपये कसे कमावले? बेटिंगचं धक्कादायक वास्तव

Khamenei Death Betting: अली खामेनेई यांच्या मृत्यूवर ऑनलाइन सट्टा लावून काहींनी लाखो रुपये कमावले. या प्रकारामुळे ऑनलाइन सट्टेबाजीच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Khamenei Death Betting
Khamenei Death BettingPudhari
Published on
Updated on

Khamenei Death Betting: जगभरात राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्यांसाठी एक धक्कादायक आणि तितकाच चिंताजनक ट्रेंड समोर आला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर ऑनलाइन सट्टेबाजीचा मोठा खेळ उघडकीस आला आहे. काही लोकांनी या घटनेवर पैज लावून लाखो रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे.

मृत्यूच्या आधीच लावला होता सट्टा

अहवालानुसार, खामेनेई यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच शेकडो लोकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर याच दिवशी त्यांचा मृत्यू होईल, असा दावा करत सट्टा लावला होता. हा सट्टा पॉलीमार्केट (Polymarket) या अमेरिकन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लावला होता. या एका घटनेमुळे 130 मिलियन डॉलरची (जवळपाल 1,000 कोटी) उलाढाल झाली. काही सट्टेबाजांनी यातून हजारो डॉलर्सचा नफा कमावला.

राजकीय सट्टेबाजीचा वाढता ट्रेंड

अमेरिकेत आणि इतर देशांत राजकीय घटनांवर सट्टेबाजी करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, इराणशी संबंधित घटनांवर एका दिवसातच 400 मिलियन डॉलरपेक्षा (जवळपास 3,300 कोटी) जास्त व्यवहार झाले.

लोकांनी फक्त खामेनेई यांच्या मृत्यूवरच नव्हे, तर अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये प्रवेश करेल का, युद्धविराम कधी होईल किंवा स्ट्रेट ऑफ होर्मुज किती दिवस बंद राहील? अशा अनेक मुद्द्यांवर सट्टा लावला आहे.

काही सट्टेबाजांनी तर इराणवर अणुबॉम्ब टाकला जाईल का? यावरही पैसे लावले आहेत.
यानंतर संबंधित प्लॅटफॉर्मने अशा प्रकारचे विषय काढून टाकले आहेत. एका युजरने फक्त इराणशी संबंधित सट्टेबाजीतून 5 लाख डॉलरपेक्षा जास्त कमाई केल्याचंही समोर आलं आहे.

Khamenei Death Betting
Kim Jong Un | किम जोंग उन तिसर्‍यांदा उत्तर कोरियाचे प्रमुख

संशय आणि चौकशी सुरु

या प्रकारामुळे काही देशांमध्ये चौकशी सुरू झाली आहे. इस्रायलमध्ये दोन व्यक्तींवर गुप्त माहितीचा वापर करून सट्टा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नॉर्वेमध्येही अशाच प्रकरणाची चौकशी सुरू आहे, जिथे एका सट्टेबाजाने नोबेल पुरस्काराशी संबंधित अंदाज लावून मोठा नफा कमावला. विशेष म्हणजे, या सट्टेबाजीत मोठ्या गुंतवणूकदारांसोबतच सामान्य लोकांचाही सहभाग होता. अहवालानुसार, बहुतेक लोकांनी 1000 डॉलरपेक्षा कमी रक्कम यात लावली होती.

ऑनलाइन सट्टेबाजीचा हा वाढता ट्रेंड केवळ आर्थिकच नाही, तर नैतिक आणि कायदेशीर प्रश्नही निर्माण करतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसारख्या संवेदनशील घटनेवर सट्टा लावून पैसे कमावणे, हा प्रकार समाजासाठी किती धोकादायक ठरू शकतो, यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news