Adani–Embraer Deal: भारतामध्येच तयार होणार प्रवासी विमाने; अदानी-एम्ब्रायरचा मोठा करार, काय फायदा होणार?

Adani Aerospace Partners Embraer: अदानी ग्रुप आणि ब्राझीलची विमाननिर्मिती कंपनी एम्ब्रायर भारतात प्रवासी विमाने तयार करण्यासाठी एकत्र आले आहेत. या पार्टनरशिपमुळे ‘रीजनल जेट’ विमाने भारतात तयार होण्याची शक्यता आहे.
Adani–Embraer Deal
Adani–Embraer DealPudhari
Published on
Updated on

Adani Embraer Aircraft Manufacturing India: भारताच्या विमान उद्योगात महत्त्वाची घडामोड घडत आहे. अदानी ग्रुप आणि ब्राझीलची आघाडीची विमान उत्पादक कंपनी एम्ब्रायर यांनी भारतात प्रादेशिक प्रवासी विमाने तयार करण्यासाठी पार्टनरशिप केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत 70 ते 146 प्रवासी क्षमतेची, लघु आणि मध्यम अंतरासाठी उपयुक्त अशी ‘रीजनल जेट्स’ भारतात तयार केली जाण्याची शक्यता आहे.

Times of Indiaच्या वृत्तानुसार, अदानी एअरोस्पेसने नुकतेच ब्राझीलमध्ये एम्ब्रायरसोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या कराराची अधिकृत घोषणा याच महिन्याच्या अखेरीस हैदराबाद येथे होणाऱ्या Hyderabad Air Show मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम असेंब्ली लाईन कुठे असेल, त्यासाठी किती गुंतवणूक होणार आहे आणि प्रकल्प कधी पूर्ण होईल, याबाबतची माहिती देण्यात आलेला नाही.

ही पार्टनरशिप भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारे विमान प्रवासाचे मार्केट आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी 1,800 हून अधिक नव्या विमानांची ऑर्डर दिलेली असून, सरकारकडून ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून जागतिक विमाननिर्मात्यांना भारतातच उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात व्यावसायिक प्रवासी विमानांची ‘फायनल असेंब्ली लाईन’ सुरू झाल्यास, अशा मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल.

एअरबस आणि बोईंगसारख्या मोठ्या कंपन्यांकडून नव्या विमानांच्या डिलिव्हरीसाठी वेळ लागत असल्याने, प्रादेशिक विमानांची मागणी वाढली आहे. अदानी-एंब्रायरची ही पार्टनरशिप देशांतर्गत आणि छोट्या शहरांमधील हवाई संपर्क सुधारण्यास मदत करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Adani–Embraer Deal
Raj and Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंची युती अखेर कशी झाली? 20 वर्ष का लागली? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन देण्याचा विचार सुरू आहे. उदाहरणार्थ, फायनल असेंब्ली लाईनमधून मिळणाऱ्या विमानांच्या ऑर्डरवर सुरुवातीला जास्त सवलती दिल्या जाऊ शकतात आणि दर 50 विमानांच्या ऑर्डरनंतर त्या हळूहळू कमी केल्या जाऊ शकतात.

Adani–Embraer Deal
Explained: देशाची प्रगती GDP ने नव्हे तर NDP ने मोजली जाणार; काय बदल होणार, सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?

सध्या एम्ब्रायरची भारतात सुमारे 50 विमाने आहेत. ही विमाने व्यावसायिक, संरक्षण आणि बिझनेस जेट अशा विविध क्षेत्रांत वापरली जातात.

एम्ब्रायरचे वरिष्ठ उपाध्यक्ष राउल विलारॉन यांनी स्पष्ट केले आहे की, पुढील 20 वर्षांत भारताला 80 ते 146 आसनक्षमतेची सुमारे 500 विमाने लागणार आहेत. हीच मागणी लक्षात घेता भारतात स्थानिक असेंब्ली लाईन उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एकूणच, अदानी-एंब्रायरची ही पार्टनरशिप भारताच्या विमाननिर्मिती क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news