Stock Market Updates | विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराचा नवा उच्चांक! कोणते शेअर्स तेजीत? | पुढारी

Stock Market Updates | विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराचा नवा उच्चांक! कोणते शेअर्स तेजीत?

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड कायम आहे. स्टॉक एक्स्चेंज बीएसई आणि एनएसई आज शनिवारी २ मार्च रोजीच्या विशेष ट्रेडिंग सत्रात नव्या उच्चांकावर खुला झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० हून अधिक अंकांनी वाढून ७३,९०० वर गेला. तर निफ्टीने २२,४०० अंकाला स्पर्श केला. शेअर बाजाराचा हा नवा उच्चांक आहे. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर टाटा स्टील, टाटा मोटर्स, एलटी, विप्रो, एसबीआय, एशियन पेंट्स हे शेअर्स वाढले आहेत. तर एनटीपीसी, एम अँड एम, सन फार्मा, टायटन हे शेअर्स किरकोळ घसरले आहेत.

निफ्टी आज २२,४०६ वर खुला झाला. त्यानंतर निफ्टीने २२,४३० अंकापर्यंत वाढ नोंदवली. निफ्टीवर हिरो मोटोकॉर्प, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एलटी आणि अपोलो हॉस्पिटल हे टॉप गेनर्स आहेत. तर एनटीपीसी, एम अँड एम, सन फार्मा हे किरकोळ घसरले.

दोन सत्रात ट्रेडिंग

आज शनिवारचे ट्रेडिंग दोन सत्रांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या सत्रात प्राथमिक साइटवरून लाईव्ह ट्रेडिंग झाले. हे सत्र सकाळी ९:१५ ते सकाळी १० दरम्यान पार पडले. पहिल्या सत्रासाठीची प्री-ओपन वेळ सकाळी ९ ते ९.०८ होती. दुसऱ्या सत्रात डिझास्टर रिकव्हरी साइटवर स्विचओव्हरचा समावेश आहे. हे सत्र सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० पर्यंत चालते.

सुट्टीच्या दिवशी शेअर बाजार खुला, कारण काय?

आज स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE ने अनपेक्षित काही घडल्यास सिस्टमच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या धोरणाचा एक भाग म्हणून शनिवारी सुट्टीच्या दिवशी बाजार खुला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान NSE आणि BSE कडून डिझास्टर रिकव्हरी साइटची चाचणी केली जाईल. त्यासाठी आज शेअर बाजार ट्रेडिंगसाठी खुला करण्यात आला. याआधीही २ मार्च रोजी शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी बाजार खुला करण्यात आला होता. एरव्ही इतर राष्ट्रीय सुट्ट्यांसह दर शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद राहतो.

रेकॉर्डब्रेक तेजी

जीडीपीत झालेली वाढ आणि जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर शेअर बाजाराने काल शुक्रवारच्या व्यवहारात रेकॉर्डब्रेक तेजी अनुभवली होती. शुक्रवारी सेन्सेक्स १,२४५ अंकांनी वाढून ७३,७४५ वर बंद झाला होता. तर निफ्टीने काल इंट्रा डे २२,३५३ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता. त्यानंतर निफ्टी ५० निर्देशांक ३५५ अंकांनी म्हणजेच १.६२ टक्क्यांनी वाढून २२,३३८ वर बंद झाला होती. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

Back to top button