Stock Market Updates | शेअर बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स ७१,७०० वर, निफ्टी २१,५०० पार | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजारात तेजीचा चौकार, सेन्सेक्स ७१,७०० वर, निफ्टी २१,५०० पार

पुढारी ऑनलाईन : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सलग चौथ्या सत्रांत तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३८० अंकांनी वाढून ७१,७०० वर पोहोचला. तर निफ्टी ९८ अंकांच्या वाढीसह २१,५३० पार झाला. बाजारात आयटी, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रात अधिक खरेदी दिसून येत आहे. (Stock Market Updates)

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, टाटा स्टील हे शेअर्स सर्वांधिक वाढले आहेत. तर एशियन पेंटर्स, मारुती हे शेअर्स किरकोळ घसरले आहेत. एनएसई निफ्टी ५० वर अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, हिंदाल्को हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर ब्रिटानिया, सिप्ला, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Updates)

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी मेटल, निफ्टी आयटी, निफ्टी बँक, ऑटो, फायनान्सियल सर्व्हिसेस, एफएमसीजी, रियल्टी आणि फार्मा तेजीत खुले झाले आहेत. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.५४ टक्के वाढला आहे. तर स्मॉलकॅप १०० हा ०.७ टक्क्यांनी वाढला आहे.

फेडरल रिझर्व्ह मार्चपासून लवकरात लवकर व्याजदरात कपात करेल या अपेक्षेने अमेरिकेतील बाजारात काल तेजी राहिली. आशियाई बाजारातही आज तेजीचा माहौल आहे. जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा एमएससीआय निर्देशांक ०.६५ टक्के वाढला आहे. आज बहुतांश आशियाई शेअर्स वाढले आहेत. जपानचा निक्केई (Nikkei) १.२ टक्क्यांनी वाढला, तर हाँगकाँगचा (Hong Kong) Hang Seng Index ही आज वाढला आहे.

Back to top button