पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० हुन अधिक अंकांनी वाढून ७१,१३० वर पोहोचला. तर निफ्टी ९६ अंकांच्या वाढीसह २१,३५० पार झाला. ( Stock Market Updates)
सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, टाटा स्टील हे शेअर्स २ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. एनटीपीसी, सन फार्मा, कोटक बँक, एचसीएल टेक, मारुती, एलटी हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी वाढले. विप्रो, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, आयटीसी हे शेअर्सही तेजीत आहेत. दरम्यान, एचडीएफसी बँक, इन्फोसिस हे शेअर्स किरकोळ घसरले आहेत.
तर निफ्टी ५० निर्देशांक २१,२९५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २१,३३७ पर्यंत वाढला. निफ्टीवर टाटा मोटर्स, डिव्हिज लॅब, कोल इंडिया, टाटा स्टील, हिंदाल्को हे टॉप गेनर्स आहेत. दरम्यान, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाइफ, ग्रासीम, एसबीआय लाइफ हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Updates)
अमेरिकेच्या बाजारातील डाऊ जोन्स, नॅस्डॅक कंपोझिट आणि एस अँड पी हे काल मजबुती वाढीसह बंद झाले. या तेजीचा मागोवा घेत आशियाई बाजारानाही सकारात्मक सुरुवात केली आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ६४ अंकांनी वाढून ३३,२०४ वर व्यवहार करत आहे. हाँगकाँगचा हँगसेंग, चीनचा शांघाय कंपोझिटही वाढला आहे.
हे ही वाचा :