Passive funds | पॅसिव्ह फंडापासून गुंतवणुकीचा प्रवास कसा सुरु करावा? जाणून घ्या अधिक | पुढारी

Passive funds | पॅसिव्ह फंडापासून गुंतवणुकीचा प्रवास कसा सुरु करावा? जाणून घ्या अधिक

- गुरजीत सिंग कलरा, बिझनेस हेड - पॅसिव्ह फंड्स - DSP एसेट मॅनेजर्स

गुंतवणूकीचा प्रवास सुरु करताना सर्वप्रथम सर्व गोष्टी योग्य जागेवर आणून सुरु करणे आवश्यक असते, स्वत:ची धोका स्वीकारण्याची क्षमता, गुंतवणूकीचे विविध पर्याय हे तुमच्या वित्तीय लक्ष्यानुसार शोधणे आवश्यक असते आणि त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीचा प्रवास सुरु करणे आवश्यक आहे.

आजच्या काळातील एक गुंतवणूकदार होणे ही एक जटील गोष्ट असते, म्युच्युअल फंड बाजारपेठेतील विविध फंडांचे विभाग आणि त्यांच्याशी निगडीत धोक्यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यानंतर कोणता म्युच्युअल फंड निवडावा ॲक्टिव्ह की पॅसिव्ह ही एक द्विधा असते. एकीकडे या विषयी अनेक मतप्रवाह असले तरीही मी असे सांगेन की गुंतवणुकीच्या या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, पर्याय नव्हेत.

जर तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल आणि म्युच्युअल फंडाचे अगदी थोडे ज्ञान असेल तर ब्रॉड इंडेक्स वर आधारीत पॅसिव्ह फंडामध्ये गुंतवणूक करणे योग्य असते. अशा व्यक्तींसाठी ज्यांना वाचन, संशोधन, अभ्यास आणि फंड निवडण्याची प्रक्रिया करायची नाही अशांसाठी ब्रॉड बेस्ड इंडेक्सवर आधारीत फंड हा उपयुक्त असतो. कारण तो दोन्हीचे प्रतिनिधीत्व करत असतो, ते म्हणजे अर्थव्यवस्थेचा मूड आणि प्रमुख लिस्टेड कंपन्या.

ज्यावेळी आपल्याकडे निफ्टी ५० इंडेक्स फंड किंवा तत्सम फंडात गुंतवणूक करण्याचा योग्य अनुभव प्राप्त होतो त्यावेळी तुम्ही लार्ज आणि मिडकॅप गुंतवणूक ही पॅसिव्ह स्पेसमध्ये करु शकता. विविध बाजारपेठीय चक्रांच्या दरम्यान या इंडायसेसच्या वागणुकीचा अंदाज आल्यानंतर तुम्ही हळूहळू ॲक्टिव्ह फंडांकडे कूच करणे आवश्यक आहे.

सुदैवाने, आज विविध ॲसेट क्लासेस आणि धोका घेण्याच्या क्षमतेनुसार अनेक पॅसिव्ह फंड्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या वैविध्यपूर्ण वित्तीय लक्ष्यानुसार मालमत्तेची निवड करु शकता. आम्ही गुंतवणूकदारांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करत असून #LetsIndex हे अशाच एका उपक्रमाचे उदाहरण आहे. ज्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इंडेक्स फंड्सनी कशी सुरुवात करुन सर्वोत्कृष्ट फंड कसा निवडावा हे शिकवतो.

संबंधित बातम्या 

 

Back to top button