

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजाराने आज ( दि. १२ ) सलग आठव्या दिवशी आपली जोरदार घोडदौड सुरु ठेवली. बाजार विक्रमी पातळीवर उघडला;पण काही मिनिटांमध्ये बाजाराने घसरण अनुभवली. सेन्सेक्स उच्चांकी ६७,५३९ अंकांवर झेप घेतली होती. सलग सात दिवसांची तेजी अनुभवल्यानंतर आठव्या दिवशी सेन्सेक्स ६७२२१.१३ वर बंद झाला. तर २०,११० चा विक्रमी उच्चांक अनुभवल्यानंतर निफ्टीनेही १९९९३.२० चा स्तर गाठला.
पीएसयू बँकिंग, मेटल आणि रियल्टी क्षेत्रातील समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात दबाव आला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल, अदानी पोर्टचे शेअर्स प्रत्येकी तीन टक्यांची घसरणीसह टॉप लूसर राहिले. बायबॅक (पुन्हा समभाग खरेदी) किमतीत वाढ झाल्याच्या वृत्तामुळे L&T चे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले आहेत.
जागतिक आर्थिक परिस्थितीमधील दोलामानता आणि देशाबाहेरील प्रमुख भांडवली बाजारांचा कल बहुतांश नकारात्मक असताना देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदीमध्ये दाखवलेल्या उत्साहामुळे मंगळवारी बाजाराचे व्यवहार सुरु झाल्यानंतरही उच्चांकी व्यवहाराची घोडदौड सुरु राहिली होती. शेअर बाजाराने मंगळवारी ( दि. १२ ) सलग आठव्या दिवशी आपली जोरदार घोडदौड सुरु ठेवली. प्रमुख बाजार निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निप्टीने प्रथमच 20110 च्या पुढे उघडला तर सेन्सेक्सनेही 300 अंकांची उसळी घेत 67539 वर झेप घेतली होती. मात्र काही मिनिटांमध्ये बाजाराने घसरण अनुभवली. दुपारी 1.29 च्या सुमारास सेन्सेक्स 99.61 अंक किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 67216.33 वर आणि निफ्टी 1.15 अंक किंवा 0.01 टक्क्यांच्या घसरणीसह 19995.20 वर व्यवहार करत होता.
खासगी क्षेत्रातील विमान कंपनी स्पाइसजेटचे शेअर्स आज ७ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. हा शेअर सध्या ७.३८ टक्क्यांनी घसरून ३७.०५ रुपयांवर व्यवहार करत आहे. एअरलाइनने माजी प्रवर्तकाला १०० कोटी रुपयांची परतफेड करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही घट झाली आहे. कलानिती मारन यांना १०० कोटींचे पेमेंट पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्पाईसजेटचे समभाग ७ टक्क्यांनी घसरले.स्पाईसजेटने सांगितले की, १२ सप्टेंबरपर्यंत माजी प्रवर्तक कलानिती मारन यांना 100 कोटी रुपयांचे पेमेंट पूर्ण करेल. सवोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती १५ लाख डॉलर्स म्हणजेच 12.44 कोटी रुपये क्रेडिट सुईस प्रकरणात भरणार आहे.
आज निफ्टी आयटी निर्देशांकाने 190 अंकांची किंवा 0.58% वाढ केली. TCS आणि Infosys आघाडीवर राहिले. ५२ आठवड्यातनंतर प्रथमच TCS Ltd. चे उच्च शेअर्स दुपारी तीनपर्यंत 2.98% वाढून 3,584 रुपये प्रति शेअर झाले, NSE निफ्टी 50 मधील 0.01% घसरणीच्या तुलनेत ते इंट्राडे 3.14% इतके वाढले प्रत्येकी 3,589.9 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. आयटी शेअर्स वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात बंद झाले. टेलिकम्युनिकेशन, युटिलिटी, पॉवर, ऑइल अँड गॅस, रियल्टी आणि सर्व्हिसेसचे निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.
साखर व्यापारी आणि कारखानांदारांनी संबंधित अधिकृत डीलर्सनी मे ते ऑगस्ट 2023 या कालावधीत केलेल्या सर्व व्यवहारांची सर्व माहिती 12 सप्टेंबरपर्यंत सादर करावी, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. आगामी सणासुदीच्या हंगामात स्वस्त दरात साखरेचा पुरेसा पुरवठा राखण्यासाठी सरकार हे पाउल उचलले आहे, असे CNBC-TV18 अहवालात म्हटले आहे. दुपारी बाराच्या सुमारास श्री रेणुका शुगर्स, दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज, ईआयडी पॅरी इंडिया, बलरामपूर चिनी मिल्स, द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज, उत्तम शुगर मिल्स, सिंभोली शुगर्स, शक्ती शुगर्स यांचे समभाग BSE वर ३-७ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.
गेल्या महिन्यात स्मॉलकॅप्स आणि मिडकॅप्सच्या मजबूत कामगिरीनंतर, गुंतवणूकदार आता त्यांच्यामध्ये नफा बुक करण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात लहान आणि मध्यम शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज स्मॉलकॅपमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. BSE मिडकॅप निर्देशांक 2.96 टक्क्यांनी घसरून बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांकाने 4.02 टक्क्यांची घसरण नोंदवली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आज सुमारे 5.53 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
व्यवहाराच्या शेवटी, 30 शेअर्सचा सेन्सेक्स 94.05 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी वाढून 67,221.13 वर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 3.15 अंकांच्या किंवा 0.016% च्या घसरणीसह 19,993.20 च्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सचे उर्वरित १५ समभाग आज लाल रंगात बंद झाले. त्यापैकी एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक 3.48 टक्क्यांनी घसरले. याशिवाय पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 1.56 टक्क्यांवरून 3.18 टक्क्यांची घसरण दिसून आली.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,805 समभागांची खरेदी-विक्री झाली. यापैकी 742 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,939 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 124 समभाग फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 263 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 20 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.
आज डॉलरच्या तुलनेत रुपयात वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 82.93 वर पोहोचला. शेअर्समधील वाढती खरेदी परदेशी गुंतवणूकदारांची भारतातील गुंतवणूक यामुळे रुपयात वाढ दिसून येत आहेत.
हेही वाचा :