गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला हा जवळपास सारखाच असतो. मग वॉरेन बफे असो किंवा हॉवर्ड मार्क्स असो. सर्वच सांगतात की, आपण कमी मूल्यांच्या असेट क्लासमध्ये गुंतवणूक करत असाल तर वास्तविकपणे पैशाची उभारणी करू शकता. अर्थात, अशा प्रकारची किमया करण्याची क्षमता हायब्रीड फंडमध्ये आहे. म्हणूनच गुंतवणूकदारांत हायब्रीड हा लोकप्रिय फंड मानला जातो. आपण कमी पैशातून गुंतवणूक सुरू करत असाल तर हायब्रीड फंडचा विचार करायला हवा.
Investors Choice : भांडवल तरलता
हायब्रीड फंडमध्ये नेहमीच भांडवलाची तरलता राहते. हा फंड स्वस्त असल्याने कमी मूल्यांच्या असेट श्रेणीत पैसे टाकण्यात गुंतवणूकदार सक्षम राहतो. त्यामुळे हायब्रीड स्ट्रॅटेजी ही जोखमीला चांगल्या रितीने हाताळण्याचे काम करते आणि उत्तम परतावा देते. परिणामी गुंतवणूकदेखील सुरक्षित राहते. संपूर्ण मार्केट सायकलच्या काळात एक धाडसी व्यक्तीस हायब्रीड फंडमधील गुंतवणुकीचा अनुभव उत्साहवर्धक राहू शकतो. कारण, हा फंड वेगवेगळ्या आणि अधिकाधिक मालमत्तेत गुंतवणूक करतो. या रणनीतीमुळे चांगला परतावा मिळतो. म्युच्युअल फंडमध्ये हायब्रीडची कामगिरी दमदार राहते.
अनेक प्रकारचे हायब्रीड फंड
हायब्रीड फंडदेखील अनेक प्रकारचे असतात. पाच प्रकारचे फंड असून त्यात एक पारंपरिक फंडाचा समावेश आहे. हा फंड पोर्टफोलिओच्या 10 ते 15 टक्के इक्विटीत आणि उर्वरित 75 ते 90 टक्के डेट फंडमध्ये गुंतवणूक करतो. कमी जोखीम घेणार्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड उत्तम आहे. त्याचवेळी त्यांना इक्विटीमधूनही फायदा घ्यायचा असतो. या श्रेणीने एक वर्षात 9.74 टक्के, तीन वर्षांत 8.72 टक्के आणि पाच वर्षांत 7.16 टक्के परतावा दिला आहे. यात आणखी एक फंड असून तो अॅग्रेसिव्ह म्हणजेच आक्रमक म्हणून ओळखला जातो. तो किमान 65 टक्के आणि कमाल 80 टक्क्यांपर्यंत इक्विटीमध्ये गुंतवणूक करतो. तसेच उर्वरित 20 ते 35 टक्के बाँड आणि अन्य हमखास परतावा देणार्या योजनेत गुंतवणूक करतो. अधिक जोखीम घेणार्या मंडळीसाठी ही श्रेणी चांगली आहे.
Investors Choice : बॅलेन्स अॅडव्हांटेज फंड
हायब्रीड फंडअंतर्गत बॅलेन्स अॅडव्हाँटेड फंड आहे. हा फंड पोर्टफोलिओच्या शून्य ते शंभर इक्विटीमध्ये किंवा तेवढीच डेटमध्ये गुंतवणूक करतो. मार्च 2020 मध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण आली. तेव्हा आयप्रू बॅलेन्स्ड अॅडव्हाँटेजने इक्विटी गुंतवणूक वाढून ती 73.7 टक्के केली. जेव्हा बाजाराने 60 हजारांची पातळी ओलांडली तेव्हा या फंडने इक्विटीत 30 टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक केली. यानुसार एक वर्षात 15.59 टक्के तर तीन वर्षात 13.79 टक्के परतावा दिला.
मल्टी असेट अॅलोकेशन फंड
हा एक ऑल टाईम हीट फंड आहे. या श्रेणीत आयप्रूने 2022 मध्ये 16.7 टक्के आणि बेंचमार्कने 5.8 टक्के परतावा दिला. या श्रेणीने एका वर्षात 17.74 टक्के, तीन वर्षांत 17.93 टक्के आणि पाच वर्षांत 10.22 टक्के परतावा दिला आहे.
Investors Choice : इक्विटी देखील दमदार
हायब्रीड फंडमध्ये इक्विटी सेव्हिंग नावाचा फंड असतो. यात इक्विटी आणि संबंधित स्रोतांत 65 टक्के आणि डेटमध्ये 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली जाते. हा फंड डेटपासून अधिक आणि इक्विटीतून कमी परतावा घेऊ इच्छिणार्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. याचाच अर्थ शेअर बाजारातील जोखीम या मंडळींना नको असते. तरीही या फंडमध्ये गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. आयप्रू इक्विटी सेव्हिंग फंडने एक वर्षात 11.32 टक्के तीन वर्षांत 11.6 टक्के आणि पाच वर्षांत 7.4 टक्के परतावा दिला.
शाश्वत विकास
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, भारताची दीर्घकाळात विकासाची दमदार वाटचाल राहिली आहे. कॉर्पोरेटची स्थितीदेखील समाधानकारक आहे. उत्पन्नात सुधारणा होत आहे. बँक प्रणाली सुस्थितीत असल्याने कर्जबुडव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एवढी यशस्वी वाटचाल जगातील अन्य देशांकडे क्वचितच असेल. या कारणांमुळे भारताचे मूल्यांकन जगाच्या तुलनेत चांगले आहे, पण आता आव्हान उच्च मूल्यांकनाचे आहे. गुंतवणूकदारांसाठी हायब्रीड हा असा फंड आहे की, तो त्याच्या क्षमतेच्या आधारावर विविध मालमत्तेत गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना जोखमीपासून वाचवतो व आक्रमक रितीने परतावा देखील देतो. या फंडांत गुंतवणूक करत आपण आरामात भविष्य सुरक्षित करू शकता.