Stock Market Updates | सेन्सेक्सची झेप ६३ हजारांजवळ, ‘या’ शेअर्सची दमदार सलामी | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्सची झेप ६३ हजारांजवळ, 'या' शेअर्सची दमदार सलामी

पुढारी ऑनलाईन : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या चलनविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आणि इतर प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून व्याजदराला विराम देण्याच्या आशेने बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने २०० हून अधिक अंकांनी वाढून ६३ हजारांवर झेप घेतली. तर निफ्टी १८,६७० वर आहे. त्यानंतर सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ६२,९०० वर तर निफ्टी १८,६४८ वर व्यवहार करत होता. आयटी, बँकिंग, फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्समध्ये वाढ झाली आहे. तसेच अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्सही वधारले आहेत. (Stock Market Updates)

सेन्सेक्सवर नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, पॉवर ग्रिड, विप्रो आणि एनटीपीसी हे शेअर्स वधारले आहेत. तर बजाज फायनान्स आणि एचसीएल टेक हे घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी FMCG ०.५४ टक्के आणि निफ्टी आयटी ०.३९ टक्के वाढला. बँकिंग, फायनान्सियल, ऑटो, मीडिया, मेटल, फार्मा, हेल्थकेअर आणि consumer durables हेदेखील आज वाढले आहेत. (Stock Market Updates)

दरम्यान, आज आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५ पैशांनी वाढून ८२.५५ वर पोहोचला, आशियाई चलनातील वाढीमुळे रुपयाला मदत झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button