Share Market Closing | सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या चिन्हात बंद, हिरो मोटोकॉर्प, Zomato ची दमदार कामगिरी | पुढारी

Share Market Closing | सेन्सेक्स, निफ्टी हिरव्या चिन्हात बंद, हिरो मोटोकॉर्प, Zomato ची दमदार कामगिरी

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे आज शेअर बाजारात तेजी राहिली. त्यात वाहनांच्या वाढत्या विक्रीच्या जोरावर Hero MotoCorp Ltd ला मिळालेली चालना आणि अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरवाढीला विराम देईल या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित झाल्या. यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. सेन्सेक्स ११८ अंकांनी वाढून ६२,५४७ वर बंद झाला. तर निफ्टी ४६ अंकांच्या वाढीसह १८,५३४ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात मेटल आणि ऑटो स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली.

‘हे’ शेअर्स वाढले, ‘हे’ घसरले

सेन्सेक्सवर टाटा स्टील, एम अँड एम, मारुती सुझूकी, एम अँड एम, सन फार्मा, एलटी, भारती एअरटेल, टायटन हे शेअर्स वाढले. तर इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, एचसीएल टेक, एशियन पेंट्स हे शेअर्स टॉप लूजर्स होते. निफ्टीवर हिंदाल्को, हिरो मोटोकॉर्प, अपोलो हॉस्पिटल, जेएसडब्ल्यू स्टील आणि टाटा स्टील हे टॉप गेनर्स होते आणि अदानी एंटरप्रायजेस, इन्फोसिस, बीपीसीएल, एचडीएफसी लाईफ या शेअर्समध्ये घसरण झाली.

हिरो मोटोकॉर्पचे शेअर्सची दमदार कामगिरी

ऑटोमध्ये टीव्हीएस मोटर कंपनी, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा हे शेअर्स टॉप गेनर्स होते. मे महिन्यात वाहनांच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स आज ८ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर कंपनीचा शेअर सुमारे ३ टक्के वाढून २,८८० रुपयांवर पोहोचला. याआधीच्या दिवशी या शेअरने २,९१२.६५ रुपयांवर व्यवहार केला होता. देशातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर मेकर असलेल्या Hero MotoCorp ची मे महिन्यातील एकूण विक्री सुमारे ७ टक्के वाढून ५,१९,४७४ युनिट्सवर पोहोचली. तर मोटारसायकल विक्रीत सुमारे ८ टक्के वाढ होऊन ती ४,८९,३३६ युनिट्स एवढी झाली आहे.

झोमॅटोचा शेअरही वधारला

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) मधील सवलतीच्या सुधारणांच्या रिपोर्टदरम्यान आज बीएसईवर झोमॅटोच्या शेअरच्या किमतीत सुमारे ८ टक्क्यांनी वाढ झाली. त्यात जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी, ख्रिस्तोफर वूड यांनी त्यांच्या इंडिया लाँग-ओन्ली पोर्टफोलिओमध्ये झोमॅटोची निवड केल्यानंतर Zomato चा शेअर चर्चेत आला आहे. आज हा शेअर ८ टक्क्यांपर्यंत वाढून ७३.२० रुपयांवर पोहोचला. कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीतील तोटा एका वर्षापूर्वीच्या ३६० कोटींवरून १८८ कोटींवर आणला आहे. या पार्श्वभूमीवर हा शेअर वधारला आहे.

हे ही वाचा :

Back to top button