चीनमध्ये तीन वर्षांनंतर साजरा झाला बन फेस्टिव्हल

चीनमध्ये तीन वर्षांनंतर साजरा झाला बन फेस्टिव्हल
Published on
Updated on

बीजिंग : चीनचा प्रसिद्ध 'हाँग काँग बन फेस्टिव्हल' आता परत आला आहे. 'कोव्हिड-19' महामारीच्या तीन वर्षांनंतर आता चुंग चाऊ या चिमुकल्या बेटावर हा महोत्सव पुन्हा एकदा साजरा झाला. त्यामधील लहान मुलांची परेड पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

हा उत्सव साजरा होणे म्हणजे हाँगकाँगमधील जनजीवन सामान्य झाल्याचेच चिन्ह आहे. महामारीच्या काळातील सर्व निर्बंधांपासून मुक्त झाल्यानंतर बेटावरील लोकांनी आपला हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या उत्सवाचा एक भाग म्हणजे 'बिऊ सिल्क परेड'. त्यामध्ये लहान मुलं सहभागी होत असतात. त्यांना ऐतिहासिक व्यक्तींसारखा किंवा देव-देवतांसारखा पोशाख घालून सजवले जात असते.

तुर्कीमधील भूकंपग्रस्तांना मदत करणार्‍या लोकांना अभिवादन म्हणून काहींनी अग्निशमन दलाच्या जवानांचेही पोशाख घातले होते. ड्रॅगनपासून पारंपरिक पोशाखांपर्यंत अनेक प्रकारच्या पोशाखांमध्ये ही मुलं नटली होती. नावाप्रमाणेच या महोत्सवात 'बन'लाही महत्त्व असते. या खाद्यपदार्थांचेही अनेक स्टॉल सजले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news