Stock Market Closing | अस्थिर व्यवहारानंतर सेन्सेक्स २०८ अंकांनी घसरून बंद, अदानींच्या ‘या’ शेअर्सच्या तेजीला ब्रेक | पुढारी

Stock Market Closing | अस्थिर व्यवहारानंतर सेन्सेक्स २०८ अंकांनी घसरून बंद, अदानींच्या 'या' शेअर्सच्या तेजीला ब्रेक

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरले. सेन्सेक्स २०८ अंकांनी घसरून ६१,७७३ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या घसरणीसह १८,२८५ वर स्थिरावला. सुरुवातीच्या व्यवहारातही सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला होता. तर निफ्टीने १८,३०० वर व्यवहार केला. त्यानंतर बाजार बंद होताना ही घसरण कायम राहिली. बाजारात आज काही प्रमाणात विक्रीचा मारा दिसून आला. (Stock Market Closing)

‘हे’ होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर सन फार्मा, टायटन, इंडसइंड बँक, आयटीसी, मारुती, टेक महिंद्रा हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर टाटा मोटर्स, एचडीएफसी, ICICI Bank, बजाज फिनसर्व्ह, एलटी, रिलायन्स हे शेअर्स घसरले.

अदानी एंटरप्रायझेसने तेजी गमावली

अब्जाधीश गौतम अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises shares) शेअर्सच्या तेजीला बुधवारी तीन दिवसानंतर ब्रेक लागला. हा शेअर दिवसाच्या निचांकी स्तरावर म्हणजे ५ टक्क्यांहून अधिक घसरला आणि बीएसईवर हा शेअर २,४९१ रुपयांवर आला. २.८ लाख कोटी रुपये बाजार भांडवल असलेला अदानी एंटरप्रायझेस हा अदानी समुहातील सर्वात मूल्यवान शेअर आहे. गेल्या तीन दिवसांत हा शेअर ३९ टक्के वाढला होता. अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर हे शेअर्सदेखील घसरले आहे. दरम्यान, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, एनडीटीव्ही या शेअर्सनी आज वाढून व्यवहार केला.

हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या नफ्यात घट, जाणून घ्या शेअरची स्थिती

हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या (Hindalco Industries Q4 Results) मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत त्याच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात ४८ टक्के घसरण झाली आहे. या तिमाहीतील हिंदाल्कोचा निव्वळ नफा ८३२ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीतील नफा १,६०१ कोटी रुपये होता. दरम्यान, आज हा शेअर सुमारे १ टक्के घसरून ४०६ रुपयांवर होता. (Stock Market Closing)

आशियाई बाजारात घसरण

आशियाई बाजारात आज बुधवारी घसरण झाली. Shanghai Composite निर्देशांक १.२८ टक्के घसरून ३,२०४ वर आला. १३ जानेवारी नंतरची याची ही निच्चांकी पातळी आहे. Shenzhen Component ०.८४ टक्के घसरला. हाँगकाँगचा Hang Seng index ला सलग दुसऱ्या दिवशी फटका बसला. हा निर्देशांक १.७७ टक्के घसरून १९,०८७ पर्यंत खाली आला. जपानचा Nikkei 225 ही ०.८९ टक्क्यांनी खाली आला. दक्षिण कोरियाचा कोस्पीने सपाट पातळीवर व्यवहार केला.

हे ही वाचा :

Back to top button