Stock Market Closing | परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असतानाही शेअर बाजार का कोसळला? जाणून घ्या यामागील 'हे' ५ घटक | पुढारी

Stock Market Closing | परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असतानाही शेअर बाजार का कोसळला? जाणून घ्या यामागील 'हे' ५ घटक

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाटाघाटी तसेच कमकुवत जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आज घसरण झाली. HDFC, इन्फोसिस आणि TCS या शेअर्सचे आज नुकसान झाले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ५८० अंकांनी घसरून ६१,३५३ वर आला. तर निफ्टी १८,२०० च्या खाली घसरला. त्यानंतर सेन्सेक्स ३७१ अंकांच्या घसरणीसह ६१,५६० वर बंद झाला. तर निफ्टी १०४ अंकांनी घसरून १८,१८१ वर स्थिरावला. भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला असतानाही दोन दिवसांत सेन्सेक्स सुमारे ९०० अंकांनी घसरला आहे. (Stock Market Closing)

‘या’ स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण

बँका, फायनान्सियल सर्व्हिसेस, आयटी, रियल्टी आणि मीडिया स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. निफ्टी बँक आणि निफ्टी PSU Bank हे क्षेत्रीय निर्देशांक सुमारे १ टक्क्याने खाली आले. कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि इंडियन बँक हे शेअर्स सुमारे १ ते २ टक्क्यांनी घसरले.

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, आयटीसी, भारती एअरटेल, मारुती, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वधारले होते. तर कोटक बँक, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टाटा स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, टाटा मोटर्स, टायटन, सन फार्मा हे शेअर्स घसरले होते.

IT स्टॉक्स घसरले

आयटीमध्ये HCL Technologies Ltd चा शेअर २.३३ टक्के घसरून १,०६५ रुपयांवर आला. MphasiS चा शेअर १.८५ टक्के घसरून १,८४५ रुपयांवर, इन्फोसिसचा शेअर (infosys share price) १.२० टक्के घसरून १,२४९ रुपयांवर आला. Zensar Technologies, Coforge हे शेअर्सदेखील घसरले. विप्रोचा (wipro share price) शेअर १ टक्के खाली येऊन ३८३ रुपयांवर राहिला. तर Tata Consultancy Services चा शेअर १ टक्क्यांहून घसरून ३,२२१ रुपयांवर आला.

Jindal Steel & Power Shares चे नुकसान

चौथ्या तिमाहीतील नफ्यात ७० टक्के घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिंदाल स्टील (Shares of Jindal Steel) अँड पॉवरचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. पण चौथ्या तिमाहीत नफा दुपटीने वाढूनही ओबेरॉय रियल्टीचे (Oberoi Realty) शेअर्स सुमारे ४ टक्क्यांनी घसरले. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या चौथ्या तिमाही नफ्यात ६९.५ टक्के घट झाली आहे. स्टीलच्या कमी किमती आणि लोखंडासारख्या कच्च्या मालाच्या उच्च किमतीमुळे Jindal Steel and Power च्या शेअर्सचे नुकसान झाले. हा शेअर सुमारे ३ टक्के घसरून ५४३ रुपयांवर आला.

जागतिक बाजारातील स्थिती

अमेरिकेतील किरकोळ विक्री डेटाच्या निराशाजनक अंदाजानंतर मंगळवारी अमेरिकेतील निर्देशांक घसरले. तसेच व्याजदरांबद्दल अनिश्चितता आणि कर्ज मर्यादा वाटाघाटीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बाजारात कमजोरी दिसून येत आहे. Dow Jones Industrial Average हा निर्देशांक १ टक्क्यानी घसरला. S&P 500 ०.६ टक्के आणि Nasdaq Composite Index ०.२ टक्के खाली येऊन बंद झाला.

Shanghai Composite घसरला, Nikkei वधारला

आशियाई बाजारातही घसरण दिसून आली. Shanghai Composite निर्देशांक ०.२३ टक्क्यानी घसरला. पण हाँककाँगचा हँगसेंग निर्देशांकची घसरण ही ०.५ टक्के होती. दरम्यान, जपानचा Nikkei 225 निर्देशांक ०.७८ टक्के वाढून ३० हजारांवर पोहोचला. सप्टेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच या निर्देशांकांने उच्चांकी पातळी गाठली.

परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी

मंगळवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) ट्रेडिंगच्या चौदाव्या सत्रातही भारतीय बाजारात खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. त्यांनी १,४०७ कोटी रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, १४ दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे २२,५०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. FII द्वारे करण्यात आलेली २९ महिन्यांतील ही सर्वात मोठी दैनंदिन खरेदी आहे.

रुपया सहा महिन्यांतील निच्चांकी पातळीवर

भारतीय रुपयाने आज बुधवारी सहा महिन्यातील निचांकी पातळी गाठली. अमेरिकेतील उच्च उत्पन्न आणि सेफ हेवन मालमत्तेचा ओघ याचा मागोवा घेत रुपया रुपया गडगडला. सकाळच्या सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ८२.४० वर होता. तर डॉलर निर्देशांकाने आज आशियाई व्यापारात १०२ अंकांवर झेप घेत उच्चांक गाठला.

हे ही वाचा :

Back to top button