Adani Group ला आणखी एक धक्का! MSCI India मधून 'या' दोन कंपन्या बाहेर, शेअर्स गडगडले | पुढारी

Adani Group ला आणखी एक धक्का! MSCI India मधून 'या' दोन कंपन्या बाहेर, शेअर्स गडगडले

पुढारी ऑनलाईन : अदानी समुहाला (Adani group) आणखी एक धक्का बसला आहे. मार्गन स्टेनली कॅपिटल इंटरनॅशनल (MSCI) ने जाहीर केले की ३१ मे पासून अदानी समुहातील दोन कंपन्या MSCI इंडिया इंडेक्समधून बाहेर पडतील. त्यात अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) यांचे शेअर्स शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात घसरले. अदानी टोटल गॅसचे शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८१२.६० रुपयांवर आला. BSE वर या शेअरला लोअर सर्किट लागले आहे. तर अदानी ट्रान्समिशनचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८७१.१५ पर्यंत खाली आला. (adani news)

निर्देशांक संकलक एमएससीआयच्या अपडेट माहितीनुसार, एमएससीआय इंडिया इंडेक्समधून तीन कंपन्या बाहेर जातील आणि तीन जोडल्या जाणार आहेत. Indus Towers ही कंपनीदेखील इंडेक्समधून बाहेर जाणार आहे. यामुळे बीएसईवर इंडस टॉवर्सचा शेअर २.३४ टक्क्यांनी घसरून १४७.९० रुपयांवर आला. (MSCI India Index)

गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या मे २०२३ इंडेक्स रिव्ह्यू घोषणेनुसार हिंदुस्तान एरोनॉटिक्स, मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूट आणि सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन या तीन कंपन्या जोडल्या जाणार आहेत. MSCI ने मॅक्स हेल्थकेअर, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि सोना BLW प्रिसिजन यांना त्यांच्या इंडिया इंडेक्समध्ये जोडण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस आणि इंडस टॉवर्स यांना MSCI इंडिया मधून हटवण्यात आले आहेत. (latest news on adani group shares)

MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सचा वापर जागतिक इक्विटी पोर्टफोलिओ बेंचमार्किंगसाठी केला जातो. MSCI ही मॉर्गन स्टॅन्ले यांच्या मालकीची एक कंपनी आहे. (msci global standard index)

हे ही वाचा :

Back to top button