Stock Market Updates | शेअर बाजार सपाट, सेन्सेक्स ६० हजारांखाली | पुढारी

Stock Market Updates | शेअर बाजार सपाट, सेन्सेक्स ६० हजारांखाली

Stock Market Updates : कार्पोरेट कंपन्यांचे तिमाही कमाईचे आकडे आणि कमकुवत जागतिक संकेत यामुळे आज बुधवारी शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी खाली येऊन ५९,६४८ वर होता. तर निफ्टी १७,६०० वर होता. इन्फोसिस आणि रिलायन्स सारख्या दिग्गज शेअर्सनी आज निराशा केली आहे.

सेन्सेक्सवर इन्फोसिस टॉप लूजर्स आहे. हा शेअर सुमारे १ टक्के घसरला. एशियन पेंट्स, सन फार्मा, एचयूएल, एचसीएल टेक, नेस्ले हेदेखील घसरले आहेत. तर टाटा स्टील, एम अँड एम, एल अँड टी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि पॉवर ग्रिड हे शेअर्स वधारले आहेत.

ICICI Lombard चे शेअर्स सुमारे ४ टक्के घसरले. या कंपनीच्या तिमाही नफ्यात ४० टक्के वाढ झाली आहे. तरीही त्यांचे शेअर्स खाली आले आहेत. निफ्टी आयटी, निफ्टी एमएमसीजी सह फार्मा, मीडिया, हेल्थकेअर, प्रायव्हेट बँक, ऑइल अँड गॅस या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे. आशियातील बहुतांश बाजारात घसरण झाली आहे. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले आहेत.

हे ही वाचा : 

Back to top button