Share Market Opening | शेअर बाजाराची सपाट सुरुवात, IT स्टॉक्सवर दबाव | पुढारी

Share Market Opening | शेअर बाजाराची सपाट सुरुवात, IT स्टॉक्सवर दबाव

Share Market Opening : कॉर्पोरेट कंपन्यांची मार्च तिमाहीतील कमाई मजबूत राहील अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. तसेच महागाई दर आणि औद्योगिक उत्पादन आकडेवारीकडेही गुंतवणुकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजार सपाट पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५२ अंकांनी वाढून ६०,२०० वर होता. तर निफ्टी १७,७०० वर व्यवहार करत होता. IT स्टॉक्समधील विक्रीमुळे शेअर बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. एचसीएल टेक, टेक महिंद्रा हे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. बँकिंग स्टॉक्सही घसरले आहेत.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मार्च तिमाहीचे निकाल आज जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर टीसीएसचा शेअर्स सपाट व्यवहार करत आहे. टाटा स्टील, एचडीएफसी, टेक महिंद्रा, अदानी ग्रीन, पंजाब नॅशनल बँक हे शेअर्स वाढले होते.

हे ही वाचा :

Back to top button