Stock Market Opening | सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढला, निफ्टी १७,२५० वर | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढला, निफ्टी १७,२५० वर

Stock Market Opening : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.३१) तेजी दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी वाढून ५८,६७२ वर पोहोचला. तर निफ्टी १९७ अंकांनी वाढून १७,२७७ वर होता. सलग तिसऱ्या सत्रात दोन्ही निर्देशांक तेजीत राहिले आहेत. आज रिलायन्स, बँकिंग आणि आयटी हे दिग्गज स्टॉक्स सर्वाधिक तेजीत होते.

सेन्सेक्सवर एचसीएल टेक, रिलायन्स आणि टेक महिंद्रा हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले. आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, नेस्ले, एम अँड एम आणि टाटा स्टील हे देखील ‍वधारले आहेत. दरम्यान, एशियन पेंट्स, सन फार्मा आणि आयटीसी हे शेअर्स घसरले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स सुमारे ७ टक्क्यांनी वाढले. संरक्षण मंत्रालयाने या कंपनीसोबत २६.९६ अब्ज रुपयांचा करार केल्यामुळे हा शेअर वाढला. दरम्यान, JSW एनर्जीचे शेअर्स सुमारे ४ टक्के वाढले.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी आयटी १.४४ आणि निफ्टी बँक १.३० टक्के वाढले. फायनान्सियल, ऑटो, एफएमसीजी, मीडिया, मेटल, फार्मा, रियल्टी, कन्झुमर ड्यूरेबल्‍स आणि ऑईल व गॅस हे स्टॉक्सही वाढून व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button