Stock Market Closing | विक्रीचा जोर वाढल्याने बाजार गडगडला, सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?

Stock Market Closing | विक्रीचा जोर वाढल्याने बाजार गडगडला, सेन्सेक्स ४०० अंकांनी घसरला, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?
Published on
Updated on

Stock Market Closing : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज शुक्रवारी (दि.२४) भारतीय शेअर बाजार गडगडला. आशियासह जगभरातील बाजारात विक्रीचा जोर राहिल्याने कमकुवत स्थिती राहिली. तसेच युरोपातील बाजारातही घसरण दिसून आली. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातही आज सुस्त स्थिती राहिली. सेन्सेक्सने आज स्थिर पातळीवर सुरुवात केली होती. तर निफ्टी १७,१०० च्या खाली होता. त्यानंतर दुपारी ३ च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे २९० अंकांनी घसरून ५७,६३२ वर होता. तर निफ्टी १७ हजारांच्या खाली घसरला होता. दुपारच्या सत्रात सेन्सेक्सची ही घसरण ४५० अंकांपर्यंत गेली होती. त्यानंतर सेन्सेक्स ३९८ अंकांच्या घसरणीसह ५७,५२७ वर बंद झाला. तर निफ्टी १३१ अंकांच्या घसरणीसह १६,९४५ वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात आयटी स्टॉक्स वधारले. तर रियल्टी, मेटल स्टॉक्सवर दबाव राहिला. आयटी आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज लाल चिन्हात व्यवहार केला. सुमारे १,१३६ शेअर्स वाढले. २,०९१ शेअर्स घसरले आणि १०५ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

'हे' होते टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स

सेन्सेक्सवर कोटक महिंद्रा, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप गेनर्स होते. तर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टायटन कंपनी आणि रिलायन्स हे टॉप लूजर्स होते. निफ्टीवर अपोलो हॉस्पिटल, कोटक महिंद्रा, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस हे टॉप गेनर्स होते. तर बजाज फिनसर्व्ह, बजाजा फायनान्स, अदानी एंटरप्रायजेस, टाटा स्टील आणि हिंदाल्को हे टॉप लूजर्स होते. आजच्या व्यवहारात हेविवेट फायनान्सियल स्टॉक्स सुमारे ०.७ टक्के घसरले. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी बारा घसरले.

आयटी स्टॉक्स १ टक्क्यांहून अधिक वाढले

Accentureच्या कमाईच्या अहवालानंतर आयटी स्टॉक्स आज १ टक्क्यांहून अधिक वाढले. यात Persistent Systems (१.७५ टक्के वाढ), एचसीएल टेक्नॉलॉजीस (१.५८ टक्के वाढ), LTIMindtree (१.५५ टक्के वाढ), इन्फोसिस (१.४९ टक्के वाढ), Zensar Technologies (१.३७ टक्के वाढ), Coforge (१.३४ टक्के वाढ), टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (१.१८ टक्के वाढ), टेक महिंद्रा (१.१७ टक्के वाढ), विप्रो (१.०९ टक्के वाढ) यांचा समावेश होता.

मेटल स्टॉक्सना फटका

मेटल स्टॉक्सही आज घसरले. त्यात हिंदोल्को, हिंदुस्तान कॉपर, नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, जिंदाल स्टील, स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील यांचा समावेश होता. जिंदाल स्टील आणि स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया यांचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. (Stock Market Closing)

आशियाई बाजारात कमजोर स्थिती

आशियाई बाजारात आज विक्रीवर जोर दिसून आला. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.१३ टक्के घसरून २७,३८५ वर आला. टॉपिक्स निर्देशांक ०.१० टक्के घसरून १,९५५ वर होता. चीनचा शांघाय निर्देशांक आणि कोरियाचा कोस्पी निर्देशांकही घसरले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news