Stock Market Opening | शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, ‘हे’ स्टॉक्स वाढले | पुढारी

Stock Market Opening | शेअर बाजारात तेजी परतली, सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला, 'हे' स्टॉक्स वाढले

Stock Market Opening : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज बुधवारी (दि.१५) शेअर बाजारात तेजी परतली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ५८,४५० वर गेला. तर निफ्टी १५४ अंकांच्या वाढीसह १७,१९७ वर होता. अमेरिकेसह आशियाई बाजारातील वाढीचा मागोवा घेत आज भारतीय शेअर बाजारानेही तेजीत सुरुवात केली आहे. इंडसइंड बँक, मारुती सुझूकी, एशियन पेंट्स, टायटन, आयसीआयसीआय, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एलटी, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, टीसीएस, आयटीसी, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो, एचडीएफसी, इन्फोसिस, रिलायन्स या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.

बुधवारी आशियाई शेअर्समध्ये वाढ झाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह कमी प्रमाणात व्याजदरवाढ करेल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. तसेच महागाईची तीव्रता कमी झाल्याने अमेरिकेतील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. परिणामी प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्ह्यात बंद झाले आहेत. आशियाई बाजारातही तेजीचे वातावरण आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १४८ अंकांनी वाढून २७,३७१ वर खुला झाला आहे. टॉपिक्स निर्देशांकही वधारला आहे. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button