Gold prices today | अर्थसंकल्पानंतर सोने- चांदी दरात मोठा बदल, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold prices today | अर्थसंकल्पानंतर सोने- चांदी दरात मोठा बदल, जाणून घ्या नवे दर

Gold prices today : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनम वस्तूंवरील सीमा शुल्क वाढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर गुरुवारी सोन्याच्या किमतीत ७७९ रुपयांची वाढ झाली. काल २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,९१० रुपयांवर बंद झाला होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६९,४४५ रुपयांवर होता. दरम्यान, आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,६८९ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर १,८०५ रुपयाने वाढून प्रति किलो ७१,२५० रुपयांवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज गुरुवारी प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोने ५८,६८९ रुपये, २३ कॅरेट ५८,४५४ रुपये, २२ कॅरेट ५३,७५९ रुपये, १८ कॅरेट ४४,०१७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३४,३३३ रुपयांवर खुला झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा उच्चांक

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५८,८२६ रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड प्रति औंस १,९५१ डॉलरवर पोहोचले आहे. हा एप्रिल २०२२ नंतरचा उच्चांकी दर आहे.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold prices today)

हे ही वाचा :

Back to top button