Stock Market Today | शेअर बाजार पुन्हा अस्थिर, अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम | पुढारी

Stock Market Today | शेअर बाजार पुन्हा अस्थिर, अदानींच्या शेअर्समध्ये घसरण कायम

Stock Market Today : अर्थसंकल्पानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांक लगेच सावरले आणि त्यांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ९० अंकांच्या घसरणीसह ५९,६१७ वर होता. तर निफ्टी १७,५५४ वर व्यवहार करत आहे.

अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण कायम आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात अंबुजा सिमेंट वगळता अदानी एंटरप्रायजेस, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, एसीसी हे शेअर्स घसरले. बँकिंग शेअर्समध्येही घसरण झाली आहे. आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, बंधन बँक, स्टेट बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक हे शेअर्स खाली आले आहेत. (Stock Market Today)

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळत आहेत. याचा मोठा फटका अदानी समूहाला बसला आहे. आता अदानी एंटरप्रायझेसने त्यांचा २० हजार कोटी रुपयांचा एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना त्यांचे पैसे परत करणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button