Stock Market Today | सेन्सेक्सने काही क्षणात तेजी गमावली, अदानींच्या शेअर्सची घसरण कायम | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्सने काही क्षणात तेजी गमावली, अदानींच्या शेअर्सची घसरण कायम

Stock Market Today : जागतिक संकेत कमकुवत आहेत. त्यात आज संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने मंगळवारी (दि.३१) तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २७० अंकांनी वाढून ५९,७७० वर गेला. तर निफ्टी १७,६०४ वर गेला होता. पण दोन्ही निर्देशांकांनी काही क्षणांत तेजी गमावली. सकाळी ९.४5 च्या सुमारास सेन्सेक्स २५० अंकांनी खाली आला.

आज चौथ्या सत्रातही अदानी समूहातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अदानींचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अदानी एंटरप्रायजेस वगळता अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन ॲनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर हे शेअर्स कोसळले आहेत. (Stock Market Today) काल सोमवारी सेन्सेक्स १६९ अंकांनी वाढून ५९,५०० वर बंद झाला होता. तर निफ्टी १७,६४८ वर स्थिरावला होता.

द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अदानींविरोधातील हिंडेनबर्ग रिसर्चच्या ३२ हजार शब्दांच्या अहवालानंतर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना गेल्या तीन सत्रांत १३.८ लाख कोटींचा फटका बसला. यात सर्वाधिक नुकसान बँकिंग स्टॉक्सचे झाले आहे. तीन सत्रांत सेन्सेक्सने सुमारे २,२०० अंक गमावले आहेत. या घसरणीमुळे बीएसई सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) २६६.६ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. या कालावधीत अदानी समूहातील शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिल्याने एकूणच शेअर बाजारातील कामगिरीवर त्याचा परिणाम झाला.

हे ही वाचा :

Back to top button