Stock Market Today | शेअर बाजारात चढ-उतार, कोणते शेअर्स तेजीत, जाणून घ्या अधिक | पुढारी

Stock Market Today | शेअर बाजारात चढ-उतार, कोणते शेअर्स तेजीत, जाणून घ्या अधिक

Stock Market Today : जागतिक संकेत संमिश्र आहेत. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी (दि.३०) शेअर बाजारातील सेन्सेक्स ५०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. तर निफ्टी १७,५०० च्या खाली आला होता. त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांनी नुकसान मागे टाकत स्थिर पातळीवर व्यवहार सुरु केला. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स ११५ च्या वाढीसह ५९,४४६ वर तर निफ्टी १७,६०० वर व्यवहार करत होता. एकूणच शेअर बाजारात आज चढ-उतार दिसून येत आहे.

सकाळच्या व्यवहारात निफ्टीवर अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि एनटीपीसी यांचे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय लाइफ, पॉवर ग्रिड, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक टॉप लूजर्स होते.

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक गेल्या शुक्रवारी हिरव्या रंगात बंद झाले होते. सोमवारी आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार झाले. चीनचा शांघाय कंपोझिट निर्देशांक २४.०३ अंक म्हणजेच ०.७३ टक्के वाढून ३,२८८ वर, जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ८६ अंकांनी वाढून २७,४६९ वर पोहोचला. तर हाँगकाँगच्या हँग सेंग आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांकांत घसरण झाली आहे. (Stock Market Today)

हे ही वाचा :

Back to top button