आश्वासक भविष्य असणारा फंड | पुढारी

आश्वासक भविष्य असणारा फंड

Thematic आणि sectoral फंडस् उच्च जोखीम पदरी बाळगतात, हे आपण अनेक वेळा पाहिले आहे. Thematic फंडाचा पोर्ट फोलिओ हा sectoral फंडाच्या पोर्टफोलिओपेक्षा अधिक विस्तृत असला तरी जोखीम ही आहेच. शिवाय बाजारात म्युच्युअल फंडाच्या विश्वात अनेक थीम्स असल्यामुळे नेमकी कोणती थीम कोणत्या वेळी गुंतवणुकीसाठी निवडावी, हासुद्धा एक गहन प्रश्न असतो. कारण बाजारात गुंतवणूक सल्लागारसुद्धा सल्ला देताना फार जोखीम न घेता फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅप फंडांची शिफारस सर्रास करतात.

परंतु, कोरोनामधील मोठ्या पडझडीनंतर सर्व देश आर्थिक आणि औद्योगिकद़ृष्ट्या सावरण्याचा प्रयत्न करत असलेले दिसून येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस् विविध उद्योग आणि वीजनिर्मिती हे सर्व नैसर्गिक खनिज संपत्तीवर अवलंबून आहे, हे आपण जाणताच. विजेची वाढती मागणी विकसनशील देशांनी हाती घेतलेले मोठ मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस् इलेक्ट्रिक वाहनांना जगभर मिळणारे प्रोत्साहन वगैरे अनेक कारणांमुळे मेटल्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार. शिवाय ही खनिज संपत्तीची उपलब्धता तिच्या अमर्याद वापरामुळे भविष्यात कमी कमी होत जाणार, हेही स्पष्टच आहे.

खनिज संपत्तीच्या भवितव्यावर एवढे पाल्हाळ लावण्याचे कारण म्हणजे मेटल्सना मागणी जर प्रचंड राहिली आणि त्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा येऊ लागली, तर मेटल्सचे भाव वाढणार आणि त्यामुळे चळपळपस म्हणजे खाणकाम क्षेत्रालाही सुगीचे दिवस येणार, यात काही शंका नाही. मग असे आश्वस्त भवितव्य असणार्‍या क्षेत्रात गुंतवणूक करणारा एखादा फंड असेल आणि त्याचा पूर्वेतिहास जर समाधानकारक असेल तर किती बहार येईल?

तर असा एक फंड नक्कीच आहे. DSP World Mining Fund हा तो फंड होय. हा एक International fund of funds (Thematic ) वर्गवारीतील फंड आहे. DSP या भारतातील 160 वर्षे जुन्या आर्थिक क्षेत्रात काम करणार्‍या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा हा फंड आहे. DSP या कंपनीचे DSP Taxsaver, DSP Equity Opport Unities, DSP Nifty 50 Index कितीतरी फंड उत्तम कामगिरी करत आहेत. DSP World mining fund 29 डिसेंबर 2009 रोजी सुरू झाला. स्थापनेपासूनच्या 13 वर्षांच्या काळात या फंडाने 4.61 टक्के इतका अत्यल्प वार्षिक सरासरी परतावा दिला असला, तरी गत 5 वर्षांपासून फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येते. त्यासाठी खालील कोष्टक पाहा.

परताव्याचे वरील कोष्टक पाहिले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे या फंडाच्या कामगिरीमध्ये प्रचंड Volutility (चढउतार) आहे. जेव्हा एखाद्या फंडामध्ये एवढे चढउतार असतात, तेव्हा तो फंड डखझ द्वारा गुंतवणूक करणार्‍यांसाठी किती फायदेशीर ठरतो, ते दुसर्‍या कोष्टकावरून लक्षात येईल.

या फंडाची गुंतवणूक Metals आणि mining क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये होत. परंतु हा Fund of Funds असल्याने ती Black Rock कंपनीच्या BGF World mining फंडाच्या युनिटमध्ये होते. Black Rock ही अमेरिकेतील 1988 पासून कार्यरत असणारा जगप्रसिद्ध अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. BGF World mining fund या फंडाची गुंतवणूक Natural Resources सेक्टरमधील 56 कंपन्यांमध्ये करण्यात आली आहे.
लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुढील 10 वर्षांच्या काळात मेटल्सची मागणी वाढत जाईल. एकूणच, खनिज संपत्तीचे पृथ्वीवरील साठे मर्यादित असल्यामुळे आणि मागणी वाढत जाणार असल्याने metals and mining सेक्टरला चांगले दिवस येतील, असे वाटते.
परंतु Thematic फंड हे मूळातच सर्व गुंतवणूकदारांसाठी नसतात. त्यातूनही या फं डाची volatility भारच असल्याने अतिशय उच्च जोखीम क्षमता आणि आर्थिक सुस्थिरता असणार्‍यांनीच या फंडाकडे वळावे. आपला गुंतवणुकीचा कालावधीही किमान दहा वर्षांचा ठेवावा आणि आपल्या गुंतवणूक निधीपैकी 10 टक्क्यांच्या वर या (किंवा या प्रकारच्या कोणत्याही) फंडामध्ये गुंतवणूक करू नये.

Back to top button