Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची स्थिर पातळीवर सुरुवात | पुढारी

Stock Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची स्थिर पातळीवर सुरुवात

Stock Market Today : भारतीय शेअर बाजार आज शुक्रवारी (दि.२०) स्थिर पातळीवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २७ अंकांनी घसरून ६०,८५० वर तर निफ्टी १८,१०० वर व्यवहार करत होता. सकाळच्या सत्रात व्होडाफोन, वेदांता, पंजाब नॅशनल बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे शेअर तेजीत होते.

बहुतांश आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. तर अमेरिकी डॉलर मे महिन्यापासूनच्या सर्वात कमकुवत पातळीच्या जवळ पोहोचला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करणार असल्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी जागतिक मंदीच्या जोखमीची धास्ती घेतली आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला आहे. एस अँड पी ५०० हा निर्देशांक ०.७६ टक्क्यांनी घसरला आहे.

अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असली तरी आशियाई बाजारांनी काही प्रमाणात लवचिकता दाखवली. जपानचा निक्केई निर्देशांक ‍वधारला आहे. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी किरकोळ अंकांनी घसरला. (Stock Market Today

हे ही वाचा :

Back to top button