Share Market Today | एका दिवसाची तेजी ओसरली, शेअर बाजाराचा मूड खराब, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण | पुढारी

Share Market Today | एका दिवसाची तेजी ओसरली, शेअर बाजाराचा मूड खराब, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

Share Market Today : सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीने प्रत्येकी १ टक्क्याहून वाढ नोंदवली होती. त्यानंतर आज मंगळवारी (दि.१०) शेअर बाजारातील तेजी थांबली. कालच्या ८४६ अंकांच्या वाढीसह ६०,७४७ वर बंद झालेला सेन्सेक्स मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे ३५० हून अधिक अंकांनी खाली आला. तर निफ्टी १८ हजारांवर आहे. जागतिक मूड खराब असल्याने त्याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहेत.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१२ टक्के वाढून ८२.२७ वर खुला झाला. मागील सत्रात तो ८२.३६ वर बंद झाला होता.
अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक संमिश्र पातळीवर बंद झाले. एस अँड पी ५०० निर्देशांक ०.१ टक्के खाली येऊन बंद झाला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ०.३ टक्क्याने घसरला. तर आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात १.०८ टक्क्याने वाढला आणि टॉपिक्स निर्देशांक ०.९१ टक्क्याने वाढला होता. तर MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात ०.०२ टक्क्याने खाली आला होता.

गुंतवणूकदारांचे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीची गती कमी करेल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

NSE वरील आकडेवारीनुसार, सोमवारी (दि.९) परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २०३.१३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,७२३.७९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button