Stock Market Today | कमकुवत जागतिक संकेताचा फटका, सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला | पुढारी

Stock Market Today | कमकुवत जागतिक संकेताचा फटका, सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला

Stock Market Today : जागतिक कमकुवत संकेतामुळे आज मंगळवारी (दि.२०) भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल ६६८ अंकांनी घसरून ६१,१९० वर तर निफ्टी २०० अंकांनी घसरून १८,२०० वर आला होता. जागतिक कमकुवत संकेत, अमेरिकेतील आर्थिक मंदीची भिती आणि चीनमध्ये वाढलेला कोरोना हे घटक भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरले आहे.

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत सलग चौथ्या सत्रात घसरण झाली. यामुळे आशियाई शेअर बाजारात मंगळवारी नकारात्मक वातावरण होते. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक १.५ टक्क्यांनी घसरला. तर चीनमधील शांघाय कंपोझिट ०.२६ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई ०.३ टक्क्याने वाढला. दक्षिण कोरियातील कोस्पी ०.३६ टक्क्यांनी घसरला.

मारुती सुझूकी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, एचसीएल टेक्नॉलॉजीस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे निफ्टीवर टॉप लुजर्स होते. तर अदानी एंटरप्रायजेस, हिरो मोटोकॉर्प, ॲक्सिस बँक, एसबीआय आणि बजाज फायनान्स हे टॉप गेनर्स होते.

सेन्सेक्सवर मारुती, एचसीएल टेक, एचयूएल, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा यांचे शेअर्स मागे पडले होते. तर एचडीएफसी बँक, पावर ग्रिड, सन फार्मा आणि एम अँड एम यांचे शेअर्सही खाली आले आहेत. केवळ बजाज फायनान्सचा शेअर ‍वधारला आहे.

हे ही वाचा :

Back to top button