Stock Market Today | शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण | पुढारी

Stock Market Today | शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Stock Market Today : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण कायम राहिली. शुक्रवारी (दि.१६) सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह ६१,४९० वर खुला झाला. तर निफ्टी १८,३०० वर आहे. युरोप आणि अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांनी आणखी दरवाढीचे संकेत दिल्याने शुक्रवारी आशियाई शेअर्स घसरले. सिंगापूर एक्स्चेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ६४ अंकांनी घसरून १८,३९५ वर आला. तर टोकियोचे शेअर्स घसरणीसह खुले झाले होते. निक्केई निर्देशांक १.३४ टक्के म्हणजे ३७६.५८ अंकांनी घसरून २७,६७५ वर, तर टॉपिक्स निर्देशांक ०.९८ टक्क्यांनी घसरून १,९५४ वर आला.

अमेरिकेचा किरकोळ विक्री डेटा आणि मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर वाढीचा निर्णय जागतिक मंदीसाठी कारण ठरेल या भीतीमुळे अमेरिकेतील प्रमुख निर्देशांकांत घसरण वाढली आहे. याचे पडसाद आशियाई शेअर बाजारात दिसून येत आहेत. (Stock Market Today)

अमेरिकेची प्रमुख मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली. या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स ८७८ अंकांनी घसरून ६१,७९९ वर तर निफ्टी २४५ अंकांनी घसरून १८,४१४ वर बंद झाला होता.

 हे ही वाचा :

Back to top button