Indian Men Belly Fat : भारतीय पुरुषांमध्ये पोटाची ढेरी का वाढते? परदेशी लोक मात्र इतके फिट कसे दिसतात?

भारतात पुरुषांमध्ये वाढते पोट आणि लठ्ठपणा ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे.
Indian Men Belly Fat
Indian Men Belly Fat : भारतीय पुरुषांमध्ये पोटाची ढेरी का वाढते? परदेशी लोक मात्र इतके फिट कसे दिसतात?file photo
Published on
Updated on

why indian men have belly fat vs western men fitness lifestyle tips

पुढारी ऑनलाईन : भारतात पुरुषांमध्ये वाढते पोट आणि लठ्ठपणा ही आजच्या काळातील मोठी समस्या बनली आहे. पूर्वी फक्त काही लोकांमध्येच वजन वाढण्याची समस्या दिसत होती, पण आता तरुणांमध्येही पोट सुटणे आणि वजन वाढणे सामान्य झाले आहे. दुसरीकडे, अनेक पाश्चात्य देशांतील पुरुष वाढत्या वयातही तंदुरुस्त आणि मजबूत शरीरयष्टीचे दिसतात.

Indian Men Belly Fat
Foods For Deep Sleep: शांत आणि गाढ झोप हवीय? आजच डाएटमध्ये समाविष्ट करा 'हे' ६ पदार्थ

तज्ज्ञांच्या मते, यामागे कोणतीही जादुई आनुवंशिकता नसून आपल्या दैनंदिन सवयी आणि आहारपद्धती जबाबदार आहेत. योग्य वेळी या सवयी बदलल्या तर पोटावरील चरबी कमी करून अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो.

प्रथिनांचे कमी प्रमाण आणि कार्बोहायड्रेट्सचे जास्त सेवन

भारतीय पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा आहार. आपल्या रोजच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण कमी, तर कार्बोहायड्रेट्सचे (पोळी, भात इत्यादी) प्रमाण जास्त असते. याउलट, पाश्चात्य देशांतील अनेक लोक संतुलित आणि प्रथिनयुक्त आहार घेतात.

तसेच, भारतीय पुरुष दिवसभरात अनेक वेळा साखरयुक्त चहा, बिस्किटे, फरसाण किंवा इतर खाऊ खातात. यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात. पाश्चात्य जीवनशैलीत गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न तुलनेने कमी प्रमाणात घेतले जाते.

Indian Men Belly Fat
Health and Fitness : फिट राहायचंय? आजच बदला या ५ सवयी!

चुकीच्या वेळेवर जेवण आणि बैठी जीवनशैली

आजच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे अनेक भारतीय पुरुषांची जीवनशैली बैठी झाली आहे. दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते.

याशिवाय, रात्री उशिरा जेवणे हीदेखील एक मोठी समस्या आहे. अनेक घरांमध्ये रात्री १० ते ११ वाजता जड जेवण केले जाते आणि लगेच झोप घेतली जाते. याउलट, पाश्चात्य देशांमध्ये बहुतेक लोक संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत हलके जेवण पूर्ण करतात. उशिरा जेवणे आणि कमी हालचाल यामुळे कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्या पोटाभोवती चरबीच्या स्वरूपात साठू लागतात.

कमी झोप, जास्त तणाव आणि पाण्याची कमतरता

लठ्ठपणाचा थेट संबंध मानसिक आरोग्य आणि झोपेच्या सवयींशीही आहे. अनेक भारतीय पुरुष कामाच्या तणावामुळे फक्त ५ ते ६ तास झोप घेतात. अपुरी झोप घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.

पाश्चात्य देशांमध्ये तणाव व्यवस्थापनाला अधिक महत्त्व दिले जाते आणि ७ ते ८ तासांची दर्जेदार झोप घेण्यावर भर दिला जातो. तसेच, भारतीयांच्या आहारात तंतुमय पदार्थ (फायबर) आणि पाण्याचे प्रमाणही अनेकदा कमी असते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय करावे?

तज्ज्ञांच्या मते, फक्त क्रॅश डायेट करून पोट कमी होत नाही. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे.

प्रत्येक जेवणात अंडी, पनीर, कडधान्ये किंवा डाळींसारखे प्रथिनयुक्त पदार्थ समाविष्ट करा.

दररोज किमान ८,००० ते १०,००० पावले चालण्याची सवय लावा.

साखर, गोड चहा, जंक फूड आणि तळकट पदार्थांचे सेवन कमी करा.

रात्रीचे जेवण शक्यतो ७ ते ८ वाजेपर्यंत पूर्ण करा.

दररोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.

आठवड्यातून ४ ते ५ दिवस नियमित व्यायाम किंवा वर्कआउट करा.

योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते आणि एकूण आरोग्यही सुधारते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news