

Chronic inflammation
आपण शरीरावर सूज आहे असं ऐकलं की, लगेच डोळ्यासमोर दुखणं, लालसरपणा आणि फुगलेली जागा उभी राहते; मात्र क्रॉनिक इन्फ्लेमेशन ही एक अशी स्थिती आहे जी शरीरात दीर्घकाळ असते आणि अनेक गंभीर आजारांना जन्म देते; पण ती सहज लक्षात येत नाही. खूपदा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करून वजनवाढ समजतात आणि व्यायाम करायला सुरुवात करतात; परंतु ही स्थिती सुधारण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
* वारंवार गॅसेस आणि अॅसिडिटी होणे :
जर तुम्हाला प्रत्येक दोन दिवसांनी गॅस किंवा अॅसिडिटी होत असेल, तर हे पचनतंत्रातील सूजेचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत पोट सतत फुगलेले दिसते आणि अनेकदा लोक ते 'बेल फॅट' समजतात; पण खरे तर ही सूज असते.
* गोड खाण्याची तीव्र इच्छा : तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर ते शरीरातील ब्लड शुगर लेव्हल असंतुलित असल्याचे लक्षण असू शकते. हे असंतुलन क्रॉनिक इन्फ्लेमेशनशी संबंधित असते. विशेषतः टाईप २ डायबिटीजच्या रुग्णांमध्ये.
* डार्क अंडरआर्म्स (काखेतील काळवटपणा) : जेव्हा शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो, तेव्हा ब्लड शुगर वाढते आणि त्याचा परिणाम बगलेवर काळसर डागांच्या स्वरूपात होतो. हे सूचित करते की, शरीरात फक्त फॅटच नाही, तर सूजही आहे.
* सततचा थकवा आणि अशक्तपणा : थकवा आणि ऊर्जा नसणे हे क्रॉनिक इन्फ्लेमेशनचं मुख्य लक्षण आहे. पुरेशी झोप घेऊनही शरीरात अशक्तपणा आणि थकवा वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावं लागेल.
* त्वचेवर वारंवार रॅशेस येणे आणि ॲलर्जी : शरीरात सूज असल्यास इम्युन सिस्टीम ओव्हर अॅक्टिव्ह होते. परिणामी, त्वचेला लवकर अॅलर्जी होते, रॅशेस येतात. हे एक स्पष्ट लक्षण आहे की, शरीरात सूज आहे.
* सांधेदुखी (जॉईंट पेन) : हाता-पायांच्या सांध्यांमध्ये जर सतत वेदना होत असतील, तर हे क्रॉनिक इन्फ्लेमेशन असू शकतं. वेळेत लक्ष न दिल्यास हे आर्थावटिसारख्या आजाराचं रूप घेऊ शकतं. तुम्हाला वाटत असेल की, तुमचं शरीर जड झालं आहे, तर एकदा वरील लक्षणं तपासा. कदाचित तुम्ही फक्त वजन वाढ समजून दुर्लक्ष करत असाल; पण तुमच्या शरीरात क्रॉनिक इन्फ्लेमेशन सुरू असू शकते. व्यायाम करण्याआधी योग्य आहाराने सूज कमी करणे हा पहिला उपाय आहे.