

सामान्यपणे जांभईला झोप येण्याशी किंवा कंटाळा येण्याशी जोडून पाहिलं जातं. जांभई दिल्याने मेंदू आणि शरीराला आळस झटकण्याची संधी मिळते असं म्हटलं जातं. मात्र, तुम्हाला दिवस-रात्र सातत्याने जांभई येत असतील, तर हे अनेक आजारांचं लक्षणं मानलं जातं.
(Health Care Tips)
सततच्या जांभया हे हृदयासंदर्भात किंवा थेट मानसिक आरोग्यासंदर्भात समस्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं या विषयातील जाणकार सांगतात. वारंवार जांभई येत असेल आणि शुद्ध हरपल्यासारखं वाटणं, श्वास अपुरा पडणं, गुंगी येणं अशा समस्या जाणवत असतील, तर तातडीने डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.
अशा गोष्टी काही विशेष कारणाने होतात असं नाही हे सारं अचानकही घडू शकतं. झोपेची कमतरता - पुरेशी झोप झाली नसेल किंवा नीट झोप झाली नसेल तर वारंवार जांभई येते. कंटाळा येणे - मानसिक थकवा आला असेल तरी वारंवार जांभई येते. हृदयासंदर्भातील समस्या सातत्याने जांभई येण्याचं कनेक्शन व्हेगस नर्व्हशी असतं.
ही नस मेंदूमधील हृदयामार्गे पोटापर्यंत जाते. न्यूरोलॉजीसंदर्भातील समस्या - काही प्रकरणांमध्ये वारंवार जांभई येणं हे मज्जासंस्थेशी संबंधित आजारांशी संलग्न असू शकतं. उदाहरणच द्यायचे झाले, तर एपिलिप्सीचं उदाहरण देता येईल.
मेंदूशी संबंधित समस्या : अगदीच दुर्मीळ प्रकारामध्ये सातत्याने जांभई येणं हे ब्रेन ट्युमर असल्याचंही लक्षणं मानलं जातं. रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी लोह हा महत्त्वाचा घटक आहे. रक्तात लोहाचं प्रमाण कमी होतं तेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळेच वारंवार जांभई येते.
शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्याच्या उद्देशाने अशावेळी जांभई दिली जाते. स्लिप अपेनिया किंवा फुफ्फुसांसंदर्भातील समस्यांमुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि वारंवार जांभई येते. उपाय काय? झोपेचा कलावधी आणि दर्जेदार झोप मिळेल असं वेळापत्रकाचं नियोजन करावं.
लोहयुक्त पदार्थांचं सेवन वाढवालं पाहिजे. यामध्ये पालक, सफरचंदसारख्या गोष्टींचा समावेश करता येईल. शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. शारीरिक हालचालही महत्त्वाची असते. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि आरोग्य उत्तम राहतं.