Vitamin B12: व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; संशोधन काय सांगते?

B12 and stroke risk: 'हे; जीवनसत्त्व आपल्या शरीरासाठी का आणि किती महत्त्वाचे आहे; जाणून घेऊया याविषयी
Vitamin B12
Vitamin B12
Published on
Updated on

नवी दिल्ली: सध्या जगभरात हृदयविकाराच्या (Heart Attack) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी१२ (B12) या महत्त्वाच्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. हे जीवनसत्त्व आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्याची कमतरता आरोग्यावर कसा परिणाम करते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

B12ची कमतरता आणि रक्तदाब

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ अकॅडेमिक मेडिसिन अँड फार्मसी' या नियतकालिकाच्या अभ्यासानुसार, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी१२चे (B12) प्रमाण कमी होते, तेव्हा रक्तदाब (Blood Pressure) वाढू शकतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे कालांतराने हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जगभरातील कोट्यवधी लोकांमध्ये बी१२ ची कमतरता आढळते, त्यामुळे हा मुद्दा उच्च रक्तदाब (Hyper-tension) रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

Vitamin B12
Vitamin B12 Deficiency Symptoms|व्हिटॅमिन B12 ची कमतरता इतकी धोकादायक का मानली जाते? जाणून घ्या शरीराला होणारे गंभीर नुकसान

व्हिटॅमिन B12 का आवश्यक आहे?

आपले शरीर स्वतःहून व्हिटॅमिन बी१२ तयार करू शकत नाही; ते आपल्याला आहारातूनच मिळते. हे जीवनसत्त्व अनेक महत्त्वाच्या कामांसाठी गरजेचे आहे जसे की,

  • लाल रक्तपेशी (Red Blood Cells) तयार करणे.

  • मज्जासंस्थेचे (Nervous System) कार्य व्यवस्थित ठेवणे.

  • डीएनए (DNA) तयार करणे.

या व्यतिरिक्त, बी१२ होमोसिस्टीन (Homocysteine) नावाचे रक्तातील एक अमिनो ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीरात होमोसिस्टीनचे प्रमाण वाढते, तेव्हा ते उच्च रक्तदाब, स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका यांसारखे गंभीर धोके निर्माण करू शकते.

Vitamin B12
Vitamin B12 Deficiency | सततचा थकवा आणि चिडचिड ? हे B12 कमी असल्याचे संकेत तर नाहीत ना ?

हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम

जेव्हा शरीरात बी१२ (B12) कमी होते, तेव्हा ते वाढलेले 'होमोसिस्टीन' इतर उपयोगी घटकांमध्ये बदलू शकत नाही. वाढलेले हे 'होमोसिस्टीन' रक्तवाहिन्यांसाठी एकप्रकारे विषारी ठरते.

ते रक्तवाहिन्यांना कठोर आणि कमी लवचिक बनवते.

त्यामुळे सूज (Inflammation) येते आणि रक्तवाहिन्यांच्या आतील थराला नुकसान पोहोचते.

यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (Plaque) जमा होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

यामुळे रक्ताच्या गाठी (Blood Clots) होण्याची शक्यता वाढते, जे थेट हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकते.

व्हिटॅमिन बी१२ हे फोलेट (Folate) आणि व्हिटॅमिन बी६ सोबत मिळून काम करते आणि होमोसिस्टीन नियंत्रित ठेवते. यापैकी कशाचीही कमतरता रक्तवाहिन्यांवर ताण वाढवते आणि रक्तदाब वाढवते.

Vitamin B12
Vitamin B12 Deficiency | थकवा, डिप्रेशन आणि विसरभोळेपणा वाढलाय? तर मग करा B12 ची टेस्ट

B12 च्या कमतरतेचे इतर परिणाम

  • रक्तदाबातील असंतुलन: इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजीत चटर्जी यांच्या मते, बी१२ च्या कमतरतेमुळे हृदयाची धडकन आणि रक्तवाहिन्यांचा ताण नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूंवर (Nerves) परिणाम होतो. या असंतुलनामुळे रक्तदाबात चढ-उतार होतात किंवा गंभीर परिस्थितीत तो सतत उच्च राहतो.

  • ॲनिमिया: खूप जास्त कमतरता असल्यास मेगालोब्लास्टिक ॲनिमिया (Megaloblastic Anemia) होऊ शकतो, ज्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते, ज्यामुळे कालांतराने रक्तदाब वाढू शकतो.

Vitamin B12
Vitamins Supplements| चुकीच्या वेळी घेतलेले सप्लीमेंट्स ठरू शकतात धोकादायक!

व्हिटॅमिन B12चे स्रोत

  1. शरीर बी१२ बनवत नसल्याने आहारातून ते मिळवणे आवश्यक आहे.

  2. मांसाहारी स्रोत: अंडी, दूध, मासे, पोल्ट्री (कोंबडी मांस) आणि इतर मांस.

  3. शाकाहारी/व्हेगन लोकांसाठी: फोर्टिफाइड फूड्स (Fortified Foods) म्हणजे बी१२ मिसळलेले अन्नपदार्थ खाऊ शकतात.

  4. ज्या लोकांना बी१२ शोषून घेण्यास त्रास होतो, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या (सप्लिमेंट) किंवा इंजेक्शन घेऊ शकतात.

Vitamin B12
‘बी 12’ जीवनसत्त्वासाठी शाकाहारी लोकांनी काय खावे?

सामान्य B12 स्तर किती असावा?

शरिरातील व्हिटॅमिन बी१२ चा सामान्य स्तर २०० ते ९०० पिकोग्राम प्रति मिलीलीटर (pg/mL) दरम्यान असावा.

२०० pg/mL पेक्षा कमी असल्यास ती कमतरता मानली जाते.

२०० ते ३०० pg/mL या स्तराला बॉर्डरलाइन स्थिती म्हटले जाते.

Vitamin B12
‘व्हिटॅमिन बी 12’च्या कमतरतेची ‘ही’ लक्षणे

आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, चांगली जीवनशैली आणि तणावावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी१२ सारख्या आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होणार नाही याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news