Vitamin B12 Deficiency | थकवा, डिप्रेशन आणि विसरभोळेपणा वाढलाय? तर मग करा B12 ची टेस्ट

Vitamin B12 Deficiency | व्हिटॅमिन B12 ची कमतरता टाळण्यासाठी आहारात काय घ्यावं? जाणून घ्या
Vitamin B12 Deficiency
Vitamin B12 Deficiency Canva
Published on
Updated on

Vitamin B12 Deficiency

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत पोषणमूल्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातूनच व्हिटॅमिन B12 ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे व्हिटॅमिन मुख्यतः मांसाहारी अन्नातून मिळत असल्याने शाकाहारी किंवा व्हेगन आहार घेणाऱ्यांमध्ये याची कमतरता अधिक दिसते. व्हिटॅमिन B12 हे लाल रक्तपेशींचं निर्माण, डीएनए निर्मिती, मेंदूचं आरोग्य आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे याची कमतरता ओळखणं आणि वेळीच उपचार घेणं महत्त्वाचं ठरतं.

Vitamin B12 Deficiency
Morning Yoga Routin |तणाव मुक्तीसाठी सकाळी करा ही ३ योगासने, दिवसभर राहा फ्रेश!

बी12 ची कमतरता ओळखण्यात जर विलंब झाला, तर मेंदू आणि नर्व्ह सिस्टमला कायमस्वरूपी नुकसान पोहोचू शकतं. म्हणूनच, शरीरात याची लक्षणं दिसू लागल्यास त्वरीत तपासणी व उपचार घेणं गरजेचं ठरतं. आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण पण दुर्लक्षित घटक म्हणजे व्हिटॅमिन B12. हे व्हिटॅमिन नुसतंच रक्त निर्माणासाठी महत्त्वाचं नाही, तर मेंदू व मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेसाठीही गरजेचं आहे. पण आजकालच्या खाण्याच्या सवयींमुळे, विशेषतः शाकाहारी किंवा व्हेगन आहार घेणाऱ्यांमध्ये याची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते.

B12 ची कमतरता झाल्यास शरीरात काही ठळक लक्षणं दिसतात ज्याकडे दुर्लक्ष केल्यास मेंदू आणि नर्व्ह सिस्टीमला कायमस्वरूपी हानी पोहोचू शकते. डोकेदुखी, थकवा, त्वचेचा पिवळसरपणा, विसरभोळेपणा, आणि डिप्रेशन ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे जर अशी लक्षणं जाणवत असतील, तर त्वरीत चाचणी करून तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Vitamin B12 Deficiency
Birth Control Pills Risk | गर्भनिरोधक गोळ्यांघेणे फायदेशीर की घातक? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिटॅमिन B12 ची कमतरतेची प्रमुख लक्षणं:

  • अती थकवा व अशक्तपणा

  • त्वचा पिवळसर दिसणे (Pale Skin)

  • स्मरणशक्ती कमी होणे किंवा विसरभोळेपणा

  • डोकेदुखी व चक्कर येणे

  • हातपायात झणझणाट किंवा सुन्नपणा जाणवणे

  • डिप्रेशन व चिडचिडेपणा वाढणे

  • पचनतंत्राशी संबंधित समस्या – गॅस, बद्धकोष्ठता, ब्लोटिंग

  • दृष्टिदोष किंवा डोळ्यांचं कमजोर होणं

  • हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढणे

  • भूक न लागणे व वजन कमी होणे

व्हिटॅमिन B12 ची कमतरतेची प्रमुख लक्षणं:

  • मांस, मासे, अंडी, दूध, चीज, दही यांचा आहारात समावेश

  • शाकाहारींसाठी B12 सप्लिमेंट्स किंवा फोर्टिफाइड फूड्स

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित रक्तचाचण्या

  • पचनसंस्थेशी संबंधित आजार असल्यास उपचार घेणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news