Asthma Care | या कारणांमुळे उद्भवतात श्वसनाच्या समस्या

पावसाळ्यात श्वसनासंबंधी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
Asthma Care
श्वसन संसर्ग टाळण्यासाठी...| Asthma Care File Photo
Published on
Updated on

डॉ. समीर गर्दे

पावसाळ्यात धूलिकण, परागकण, हवेतील ओलसरपणा, प्रदूषके या कारणांमुळे श्वसनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्यात सामान्य सर्दी- पडसे, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि दमा यासारख्या श्वसन संक्रमणाचा धोका वाढतो. हवामान आणि तापमानातील बदल हे जंतू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी उत्तम ठरते.

(Asthma in monsoon season)

पावसाळ्यात श्वसनासंबंधी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वापरलेल्या टिश्यूची योग्य विल्हेवाट लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि हवेतील रोगजंतू आणि विषारी द्रव्यांचा थेट संपर्क कमी करण्यासाठी गरज भासल्यास मास्कचा वापर करून स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यातील श्वसन संक्रमण

सर्दी-पडसे : पावसाळ्यात आढळणारा श्वसन संसर्ग सर्वात सामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. हवामानातील संक्रमणकालीन बदलामुळे विषाणूंच्या अनेक प्रकारांमुळे सर्दी होऊ शकते. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सर्दीची लागण होऊ शकते.

यामध्ये छातीत घरघर, घसा खवखवणे, खोकला, सर्दी, डोकेदुखी आणि नाक वाहणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. डॉक्टरांनी सांगितलेली आवश्यक खबरदारी आणि औषधे घेतल्यानंतर काही दिवसांत लक्षणे कमी होतात.

न्यूमोनिया : हा फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग आहे, ज्यामुळे अस्वस्थता आणि श्वसनासंबंधी विकार होतो. यामुळे पावसाळ्यात वाढलेल्या ओलाव्यामुळे आणि वातावरणातील ओलसरपणामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. या काळात लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण, ते संक्रमित व्यक्तीकडून इतर व्यक्तीमध्ये पसरू शकते.

ब्राँकायटिस : यामुळे फुफ्फुसातील वायुमार्गात तीव्र जळजळ होते. या जळजळीमुळे एखाद्याला खोकला येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो. ब्राँकायटिसमुळे श्वासनलिका अरुंद होते आणि फुफ्फुसातील हवेचा प्रवाह मर्यादित होतो.

दमा : पर्यावरणीय घटक तसेच जीवनशैलीतील बदलामुळे पावसाळ्यात दम्याची लक्षणे वाढू शकतात. वाढलेली आर्द्रता, ओलावा आणि वातावरणातील दबाव श्वसनमार्गात अडथळा निर्माण करू शकतो, ज्यामुळे श्वास घेणे नेहमीपेक्षा कठीण होते. पावसाळ्यातील सोसाट्याचा वारा हवेत बाष्प, परागकण आणि धुळीचे कण पसरवू शकतात.

हे कण सहजपणे श्वासावाटे आत घेतले जातात. कारण, ते आकाराने लहान असतात. त्यामुळे श्वसनासंबंधी विकार उद्भवतात. भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी सोबत इनहेलर बाळगावे. पाळीव प्राण्यांशी जवळचा संपर्क टाळावा. कारण, त्यांचा कोंडा आणि लाळ तुमची लक्षणे आणखी वाढवू शकतात. पावसाळ्यात उबदार व गरम कपडे वापरावीत.

Asthma Care
राजकोट किल्ल्यावर भाजप-मविआ कार्यकर्त्यांमध्ये राडा
Asthma Care
Rupali Bhosle |कपाळी चंद्रकोर, नाकात नथ; साडीत भारी रुपाली भोसले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news