Health News: दिवसभर एका जागी बसून राहणे आरोग्यासाठी का हानिकारक, हृदयविकार तज्ञ काय सांगतात?

दिवसभर ऑफिसच्या खुर्चीत बसून काम करणे आणि 'मी सकाळी किंवा संध्याकाळी १ तास व्यायाम करतोच की!' अशा समजात राहणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
Desk job health tips
Desk job health tipsFile Photo
Published on
Updated on

Desk job health tips

नवी दिल्ली: दिवसभर ऑफिसच्या खुर्चीत बसून काम करणे आणि 'मी सकाळी किंवा संध्याकाळी १ तास व्यायाम करतोच की!' अशा समजात राहणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. दिवसभरातील दीर्घकाळाची निष्क्रियता केवळ १ तासाच्या व्यायामाने भरून निघू शकत नाही, असा गंभीर इशारा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी दिला आहे. सतत बसून राहण्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे चयापचय क्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिवसभर बसून राहणे आरोग्यासाठी इतके हानिकारक का आहे?

‘सर्क्युलेशन जर्नल’ आणि ‘आयसीएमआर-इंडियाब’ च्या अभ्यासाचा संदर्भ देत डॉ. जेरेमी यांनी 'हिंदुस्तान टाईम्स' ला दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश नागरिक आपल्या जागेवर बसूनच जास्त वेळ घालवतात. सतत एकाच जागी बसल्याने शरीरातील साखर आणि चरबी पचवण्याची क्षमता मंदावते. यामुळे रक्ताभिसरण संथ होते, न कळत वजन वाढते, टाईप-२ मधुमेहाचा धोका दुप्पट होतो आणि हृदयविकारासह अवेळी मृत्यूची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. आपले शरीर हे सातत्याने हालचाल करण्यासाठी बनले आहे. शरीराची हालचाल हेच खरे औषध आहे.

Desk job health tips
NITI Aayog Report: ना शिक्षण, ना रोजगार! देशातील ८.७ कोटी तरुण करतात तरी काय? नीती आयोगाचा धक्कादायक अहवाल

व्यायामाद्वारे निष्क्रिय जीवनशैलीची भरपाई होऊ शकते का?

व्यायाम करणारे अनेक लोक असा विचार करतात की, डेस्कवर घालवलेल्या तासांची भरपाई जिममधील एका तासाच्या व्यायामाने करता येईल. पण हे अजिबात खरे नाही. डॉ. जेरेमी यांच्या मते, "सकाळचा व्यायाम उत्तम आहे आणि काहीच न करण्यापेक्षा तो नक्कीच चांगला आहे; परंतु सकाळी केलेला १ तासाचा व्यायाम १० तास बसून राहण्याच्या परिणामांची भरपाई करू शकत नाही. त्यासाठी दिवसभरात वेळोवेळी होणारी हालचाल अत्यंत गरजेची आहे."

आरोग्य जपण्यासाठी सोपे उपाय

लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.

दुपारच्या जेवणासाठी जाताना चालत जा.

फोनवर बोलताना उभे राहून किंवा चालत बोला.

बैठकांमध्ये किंवा कामाच्या ब्रेकदरम्यान १० स्क्वॉट्स करा.

थोडा वेळ मोकळ्या हवेत व्यतीत करा.

Desk job health tips
Biological age: शरीर किती वेगाने म्हातारे होत आहे आता समजणार? वैज्ञानिकांनी तयार केले ‘PASTA’ टूल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news