Biological age: शरीर किती वेगाने म्हातारे होत आहे आता समजणार? वैज्ञानिकांनी तयार केले ‘PASTA’ टूल

एखाद्या व्यक्तीचे वय कॅलेंडरनुसार किती आहे, यापेक्षा शरीर आतून किती वेगाने वृद्ध होत आहे, हे आता समजणे शक्य होणार आहे.
Biological age:
Biological age: File Photo
Published on
Updated on

Biological age:

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीचे वय कॅलेंडरनुसार किती आहे, यापेक्षा शरीर आतून किती वेगाने वृद्ध होत आहे, हे आता समजणे शक्य होणार आहे. स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट आणि स्टॉकहोम विद्यापीठातील संशोधकांनी ‘PASTA’ नावाचे एक नवीन टूल विकसित केले आहे. पेशींमधील जनुकांच्या सक्रियतेचे विश्लेषण करून हे टूल शरीराचे जैविक वय आणि पेशी किती वेगाने वृद्ध होत आहेत, याचा अंदाज घेण्यास मदत करणार आहे.

पेशींचे जैविक वय सांगणार ‘PASTA’

संशोधकांनी विकसित केलेले PASTA टूल पेशींमधील जनुकांच्या सक्रियतेचा अभ्यास करते. कोणते जनुक सक्रिय आहेत आणि कोणते निष्क्रिय आहेत, याचे विश्लेषण करून पेशींच्या जैविक वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. या संशोधनाचा अभ्यास ‘Advanced Science’ या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे, पेशींच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक शोधण्याचीही या टूलची क्षमता आहे. त्याचबरोबर जुन्या आणि वृद्ध होत असलेल्या पेशी तसेच तरुण किंवा स्टेम सेलसदृश पेशींमधील फरक ओळखण्यासही हे टूल मदत करू शकते.

Biological age:
High Hemoglobin levels: रक्तातील हिमोग्लोबिन वाढणेही अत्यंत धोकादायक; पाहा ही मुख्य कारणे

१७ हजारांहून अधिक टिश्यू नमुन्यांचा अभ्यास

वाढते वय हे अनेक आजारांसाठी महत्त्वाचे जोखीम घटक मानले जाते. मात्र, शरीरातील पेशी नेमक्या किती वेगाने वृद्ध होत आहेत, हे मोजण्यासाठी प्रभावी पद्धतींची कमतरता आहे, असे संशोधकांनी सांगितले. PASTA टूल विकसित करण्यासाठी निरोगी व्यक्तींकडून घेण्यात आलेल्या १७ हजारांहून अधिक टिश्यू नमुन्यांमधील जनुक सक्रियतेच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासातून जैविक वय अधिक असलेल्या पेशींमध्ये डीएनएला झालेली हानी आणि पेशींवरील ताणाशी संबंधित जनुकांची सक्रियता अधिक असल्याचे आढळले.

३० लाखांहून अधिक जनुक प्रोफाइल्सचे विश्लेषण

यानंतर संशोधकांनी सार्वजनिक डेटाबेसमधील ३० लाखांहून अधिक जनुक प्रोफाइल्सचे विश्लेषण करण्यासाठी PASTA चा वापर केला. या प्रोफाइल्समध्ये पेशींवर हजारो औषधे आणि विविध आनुवंशिक बदलांचा परिणाम तपासण्यात आला होता. या विश्लेषणातून पेशींचे जैविक वय वाढवणारे किंवा कमी करणारे काही पदार्थ तसेच जैविक सिग्नलिंग मार्ग शोधण्यात आले. यापैकी काही निष्कर्षांची नंतर मानवी पेशींवर प्रयोगशाळेत चाचणी घेऊन पडताळणी करण्यात आली.

वृद्धत्वाची प्रक्रिया समजण्यास मदत

संशोधक जेरोम सॅलिग्नान यांच्या मते, PASTA च्या माध्यमातून काळानुसार पेशींमध्ये नेमके कोणते बदल होतात, याचा अभ्यास करता येईल. तसेच शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया कोणत्या घटकांमुळे वेग घेते, याबाबतही अधिक माहिती मिळवता येऊ शकते. संशोधकांच्या मते, भविष्यात अशा प्रकारची साधने वृद्धत्वाशी संबंधित आजारांचा अभ्यास, औषधांच्या परिणामांचे परीक्षण आणि पेशींच्या आरोग्यातील बदल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Biological age:
Hair growth: केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करणाऱ्या ५ वनस्पती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news