

आरोग्याच्या चर्चेत अंडं नेहमीच वादग्रस्त ठरतं. कोण म्हणतं प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत, तर कोण म्हणतं कोलेस्टेरॉल वाढवतं. पण खरा प्रश्न असा आहे की अंडं आपल्याला खरंच हानिकारक आहे का? आरोग्यतज्ज्ञ नेमकं काय सांगतात. अंडं खावे की नको? आणि कोणी कसं खावं याबद्दल वैज्ञानिक माहिती जणून घ्या आणि अंड्यांबाबत तुमचा गोंधळ आणि गैरसमज संपवा.
अंडं हे नैसर्गिकरित्या संतुलित, डॉक्टरांनी मान्य केलेलं, कमी खर्चिक आणि जास्त लाभदायक सुपरफूड आहे. महागडे प्रोटीन शेक्स आणि ओट्स नक्की चांगले, पण घरातलं साधं अंडं विसरून चालणार नाही. त्यामुळे नेमके अंड्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत याविषयी जाणून घेऊया...
हाय क्वॉलिटी प्रोटीन (High-Quality Protein) - अंड्यामध्ये उच्च प्रतीचं प्रोटीन असतं, त्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.
व्हिटॅमिन D (Vitamin D) - हाडं मजबूत ठेवतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
कोलीन (Choline) - स्मरणशक्ती सुधारतो, मेंदूच्या पेशींच्या कार्यासाठी उपयुक्त.
व्हिटॅमिन B12 (Vitamin B12) - थकवा कमी करतो, मज्जासंस्थेचं रक्षण करते.
ल्यूटिन (Lutein) - डोळ्यांचं आरोग्य टिकवतो, दृष्टी सुधारते.
सॅटायटी फॅक्टर (Satiety) - गरजेपेक्षा जास्त खाणं थांबवतं, भूक नियंत्रणात ठेवते.
लोह + झिंक (Iron + Zinc) - हिमोग्लोबिन वाढवतो, रक्तनिर्मितीस मदत करतो.
वजन कमी करण्यात मदत (Weight loss) - दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं.
चांगलं कोलेस्टेरॉल (HDL) वाढवते - हृदयासाठी उपयुक्त.
नैसर्गिक मल्टिविटॅमिन (Natural multivitamin) - रोगप्रतिकारशक्ती वाढवते, संपूर्ण शरीराचं पोषण करते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार,
रोज १ संपूर्ण अंडं (पांढरा + पिवळा भाग).
उकडलेलं सर्वोत्तम, कारण तेलमुक्त असतं.
पिवळा भाग मर्यादेत खावा – तो पोषणद्रव्यांनी समृद्ध आहे.
कच्चं अंडं टाळा – संसर्गाचा धोका जास्त.
फ्राय करताना तेल अगदी कमी वापरा.
रोज १ पूर्ण अंडं किंवा २ फक्त पांढरे भाग.
LDL (वाईट कोलेस्टेरॉल) जास्त असेल, तर आठवड्यातून ३–४ अंडी पुरेशी.
अंड्यासोबत भाजीपाला खाल्ल्यास संतुलित आहार तयार होतो.
फॅड डायट्स टाळा – शाश्वत आरोग्यदायी सवयी अंगीकारा.