Smoking Risks In Pregnancy | गरोदरपणात धूम्रपान करताय? आईच्या या सवयींमुळे, बाळाचं आरोग्य येते धोक्यात, जाणून घ्या कसे

Smoking Risks In Pregnancy | धूम्रपान केल्याने केवळ स्वतःचं नव्हे, तर बाळाचंही आरोग्य धोक्यात येतं. डॉक्टरांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Smoking Risks In Pregnancy
Smoking Risks In Pregnancy Canva
Published on
Updated on

Smoking Risks In Pregnancy

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास गोष्ट असते. पण अलीकडे अनेक महिला, विशेषतः २५ ते ३५ वयोगटातील, सिगारेट ओढायला लागल्या आहेत. धूम्रपान केल्याने केवळ स्वतःचं नव्हे, तर बाळाचंही आरोग्य धोक्यात येतं. डॉक्टरांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Smoking Risks In Pregnancy
Desk Job Health Risks | दीर्घकाळ बसून काम करताय?

धूम्रपानाची वाढती सवय

अनेक महिला सिगारेट ओढतात, पण त्याचा गर्भावर काय परिणाम होतो हे त्यांना माहीत नसतं. गर्भवती असताना किंवा गरोदर होण्याच्या प्रयत्नात असताना धूम्रपान केल्यास बाळाची वाढ थांबते, गर्भपात होतो, वेळेआधी बाळाचा जन्म होतो किंवा काही वेळा बाळ मरण पावतो.

डॉक्टर काय सांगतात?

डॉ. पद्मा श्रीवास्तव, स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात, “सिगारेटमध्ये निकोटिन, कार्बन मोनॉक्साइडसारखे घातक रसायने असतात. हे बाळापर्यंत पोहोचतात आणि त्याला ऑक्सिजन मिळणं कमी होतं. यामुळे बाळ नीट वाढत नाही.”

यामुळे प्रसूतीच्या वेळी त्रास होतो, प्लेसेंटा (बाळाला अन्न-ऑक्सिजन देणारी नाळ) वेळेपूर्वी वेगळी होऊ शकते. धूम्रपान केल्याने आईचं दूधही निकोटिनयुक्त होतं, जे बाळासाठी घातक आहे.

बाळावर होणारा परिणाम

प्रजननतज्ज्ञ डॉ. निशा पानसरे यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहिती प्रमाणे, “गर्भातच बाळ धूर आणि घातक रसायनांच्या संपर्कात येतं. त्यामुळे त्याची मेंदूविकास, फुफ्फुसं, वजन आणि आरोग्यावर परिणाम होतो.”

धूम्रपान करणाऱ्या आईंच्या बाळाला पुढे:

  • दम्याचा त्रास

  • वारंवार सर्दी-खोकला

  • अचानक मृत्यूचा धोका (SIDS)

  • भविष्यात मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो.

Smoking Risks In Pregnancy
Menopause| रजोनिवृत्तीदरम्यान घ्या हृदयाची काळजी

IVF (टेस्ट ट्यूब बेबी)वरही परिणाम

जर एखादी स्त्री आयव्हीएफ (IVF) पद्धतीने आई बनण्याचा प्रयत्न करत असेल आणि ती धूम्रपान करत असेल, तर तिला यश मिळण्याची शक्यता कमी होते.

यामागची मुख्य कारणं अशी आहेत:

  1. अंड्यांची गुणवत्ता घटते: सिगारेटमधील हानिकारक घटकांमुळे स्त्रीच्या शरीरातील अंडी खराब होऊ शकतात. चांगली अंडी नसल्यास गर्भ तयार होण्यात अडचण येते.

  2. गर्भ रुजण्यास अडथळा: जरी अंडं फलित होऊन गर्भ तयार झाला, तरी धूम्रपानामुळे तो गर्भ आईच्या गर्भाशयात व्यवस्थित रुजत नाही. गर्भ रुजला नाही, तर गर्भधारणा पुढे जाऊ शकत नाही.हे"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news